Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

असभ्य वर्तणूक, जातीवाचक शिविगाळ केल्याचा नगराध्यक्षांचा आरोप;अहेरी नगरपंचायतीच्या प्रभारी मुख्याधिकाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार,नगराध्यक्ष रोजा करपेत यांच्या शिष्टमंडळानी जिल्हाधिकारी यानां दिले निवेदन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अहेरी नगरपंचायत अंतर्गत ई-निवेदा ऑफलाईन पद्धतीने  निविदा काढण्यात आले असून  या संदर्भात नगरपंचायतचे मुख्याधिकारी दिनकर खोत यांनी कोणतीही प्रक्रिया न राबवितां या शिवाय  नगरपंचायत च्या कोणत्याही  स्थायी समितीला विश्वासात न घेता आपल्या पदाचा दुरुपयोग करून अवैधरित्या निविदा उघड केले आहे. नियमानुसार  विकास कामाच्या नोटीस बोर्डावर दि, 21/03/2023 ते  27/03/2023 च्या 3; ००  वा.दरम्यान  निविदा  स्विकृती अंतिम दिनांक व वेळ दिनांक 29/03/2023 शक्य झाल्यास निविदा उघडण्यात येईल. या प्रकारे निविदा सूचना नोटीस बोर्डावार लावणे अनिवार्य असतांना मुख्याधिकारी यांनी काही कांत्राटदारनां आपल्या  विश्वासात घेवून  चाणक्य बुद्धीने नोटीस बोर्डावर नगरपंचायत  पदसिध्द नगरसेवकांच्या अनुउपस्थितीत नोटीस बोर्डावर निविदा सूचना लावून नोट कॅमेरा व  अर्जाचे  चलचित्र  काढून हेतूपूरस्पर निविदा लपवून पारदर्शता न बाळगता कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा  सोबत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यांना विश्वासत न घेता गोपनीय पद्धतीने निविदेची कार्यवाही पार पडली.त्यामुळे अनेक बेरोजगार कांत्राटदार यांना ई – निविदा व ऑफलाईन निविदा भरण्या पासून वंचित राहिले.बहुचार्चित व स्थानिक,राष्ट्रीय वर्तमान पत्रात निविदा प्रसिद्ध करण्या ऐवजी  निवडक वर्तमानपत्रात या निविदेची जाहिरात देऊन हेतूपरस्पर विशिष्ट कत्राटदाराना लाभ पोहचविण्याकरिता षडयंत्र रचण्यात आले असल्याचा आरोप जिल्हाधिकार्याच्या दिलेल्या निवेद्नात  केला आहे .

अहेरी दि,७ एप्रिल :  अहेरी स्थानिक नगरपंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी दिनकर खोत यांनी नगराध्यक्ष रोजा शंकर करपेत यांच्या कक्षात जाऊन असभ्य वर्तवणूक करीत जातीवाचक शिविगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी प्रभारी मुख्यधिकारी यांच्याविरुद्ध अॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नगराध्यक्ष रोजा करपे यांनी अहेरी पोलिसांकडे तक्रार अर्ज  केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुख्याधिकारी दिनकर खोत यांनी माझ्या कक्षात प्रवेश करून सर्व अधिकार माझ्याकडे आहेत . कोणतेही काम असो माझ्या कक्षात येऊन मांडावे. निविदा प्रक्रिया राबविण्याचे अधिकार मुख्याधिकारी यांच्याकडे असतात. नगर पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, बांधकाम सभापती हे पद नाममात्र आहेत. तुमचे काम सभेत येणे आहे. सर्व अधिकार शासनाने मला दिले आहेत, असे बोलल्याचे नगराध्यक्ष करपेत यांनी पोलिसांकडे तक्रार अर्जात म्हटले आहे.

मुख्याधिकारी दिनकर खोत एवढ्यावरच न थांबता त्यांनी जातीवाचक शिविगाळ केल्याचाही आरोप नगराध्यक्षांनी केला आहे. दरम्यान, नगराध्यक्षांनी समाजाबद्दल अशी शिविगाळ करणे योग्य नाही, असे म्हटले असता मुख्याधिकारी यांनी तुम्ही माझे काहीही विघडवू शकत नाही, असे प्रतिउत्तर दिले. अशाप्रकारच्या वर्तवणुकीने मी भयभीत झाले असून यापूर्वीचे मुख्याधिकारी सर्वांना चांगली वागणूक देत होते. मात्र पदाधिकारी, सदस्य यांच्याशी ते चांगले वागले नाही. आदिवासी महिला तसेच अहेरी नगर पंचायतच्या प्रथम नागरिकाला जाणूनबुजून द्वेष भावनेने माझा व माझ्या समाजाचा अपमान प्रभारी मुख्याधिकारी खोत यांनी केल्याने त्यांच्यावर अॅट्रासिटी तसेच इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार नगराध्यक्ष रोजा करपेत यांनी अहेरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी अहेरी नगरपंचायतचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन बालकल्याण सभापती मीना ओंडरे, बांधकाम सभापती नौरास शेख, नगरसेविका ज्योती सडमेक, नगरसेवक विलास सिडाम, नगरसेवक विलास गलबाले, नगरसेविका सुरेखा गोडसेलवार, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, नगरसेवक महेश बाकेवार, नरेश गर्गम, राकेश सडमेक, प्रमोद अधिकार गोडसेलवार, मरपल्ली मुख्याधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, प्रकाश दुर्गे यावेळी उपस्थित होते.

या  प्रकरणाबाबत अहेरी पोलिस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक  यांना भ्रमध्वनीद्वारे विचारणा केली असता तक्रार अर्ज  प्राप्त झाला  असुन प्रकरणाची चौकशी सुरू  आहे .

किशोर मानभाव
पोलिस निरीक्षक अहेरी,

हे देखील वाचा ,

जिल्हयात गोवर – रुबेला लसीकरण मोहिमेला प्रारंभ

अल्पवयीन मुलीस देहविक्रीच्या व्यवसाय करण्यास प्रवर्तक करणाऱ्या दोघांवर गुन्हा

विविध ग्रामपंचायतीतील रिक्तपदांच्या, पोटनिवडणुकांसाठी 18 मे रोजी मतदान.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.