Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर सेमाना देव परिसर स्वच्छता

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 4 जून-  ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून आज दिनांक ४ जून रोजी वनपरीक्षेत्र कार्यालय गडचिरोली (प्रादेशिक) व परीक्षेत्र कार्यालय सामाजिक वनिकरण, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने सेमाना देव परिसर स्वच्छतेचा कार्यक्रम घेण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलासाठी केवळ मनुष्यप्राणी जबाबदार आहे. सबब आपण आपल्या आचरणात बदल करून नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर शाश्वत पध्दतीने न केल्यास दिवसेंदिवस तापमान वाढ, अवकाळी पाऊस, दुष्काळ, चक्री वादळे अशा समस्यांचा सामना करावा लागेल.
त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यायी वस्तूंचा वापर करावा. तसेच पर्यावरण पुरक वाहनांचा किंवा सार्वजनिक वाहनांचा जास्त वापर करावा जेणेकरून प्रदूषण कमी होऊन तापमानवाढीला आळा बसेल. घर, अंगण, परिसर, कार्यालय, देवस्थान, बगीचे इतर सार्वजनिक ठिकाणी कचरा करू नये. तसेच ओला व सुका कचरा वेगळा ठेवून नगरपालिकेला कचरा व्यवस्थापनासाठी मदत करावी असे आवाहन गडचिरोली वनविभागाचे उपवनसंरक्षक मिलिशदत्त शर्मा यांनी केले.

सेमाना देवपरिसरातील कचरा, प्लास्टिक, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, काचा, पालापाचोळा इ. गोळा करून परिसर स्वच्छता करण्यात आली. या कार्यक्रमासाठी गडचिरोली प्रादेशिक कार्यालयातील वनपाल नवघरे, जनबंधू, वासेकर, नंदेश्वर तसेच क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते. सामाजिक वनिकरण परीक्षेत्रातील  नीलकंठ वासेकर, कु. खुलसंगे, अलोणे तसेच इतर कार्यालयीन व क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन गडचिरोली वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके यांच्या मार्गदर्शनामध्ये गडचिरोली वनपरिक्षेत्राचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी धीरज ढेंबरे यांनी केले होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.