Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्हाधिकारी यांनी केली ऑक्सिजन प्लांटची पाहणी

Get real time updates directly on you device, subscribe now.

कोविड रुग्णांसाठी जादा ऑक्सिजन पुरवठा करण्याचे निर्देश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर दि. २३ एप्रिल: जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी आज एम.आय.डी.सी. येथील आदित्य ऑक्सिजन प्लांटला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी ऑक्सिजनचे किती उत्पादन होते आणि त्याचे वितरण कसे व कुठे कुठे होते याबाबत माहिती घेतली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोरोनाग्रस्त रुग्णांना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज असून ऑक्सिजनचा जास्तीत जास्त पुरवठा त्यांचेसाठी करण्यात यावा असे निर्देश त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. ऑक्सिजनची उत्पादन क्षमता वाढविण्यात यावी व यासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मदत करण्याचे आश्वासनही जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी त्यांना दिले. यावेळी तहसीलदार निलेश गौड व जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड हे उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.