Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अमरावती जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता 2 आठवडे उशिराने उघडणार महाविद्यालये

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती, दि. ११ फेब्रुवारी: अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढतीवर आहे. दररोज २०० रुगांच्या आसपास हा आकडा वाढतो. काल ३५९ आढळलेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून प्रशासनाने तिवसा तालुक्यातील गुरुदेवनगर  बाजारपेठ बंद ठेवण्याचं आव्हाहन केलं आहे.

एकीकडे कोरोना लसीकरण मोहीम राज्यभरात सुरू आहे. मात्र दुसरीकडे कोरोनाचा आकडा वाढतोय त्यामुळे पुन्हा एकदा माझे कुटुंब माझी जबाबदारी या संदेशाचे काटेकोर पालन करणे गरजेचे झाले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

येत्या 15 फेब्रुवारी पासून राज्यातील महाविद्यालय सुरू करण्याचे आदेश उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले होते. मात्र अमरावती जिल्ह्यात 1 फेब्रुवारी पासून दिवसेंदिवस झपाट्याने कोरोना रुग्णांची वाढ होत असल्याने 15 फेब्रुवारी पासून सुरु होणारे महाविद्यालयं  दोन आठवड्यांनी उशिरा सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी अमरावती विद्यापीठाला दिले आहे.

ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अमरावती जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत चाललेली आहे.काल कोरोना बाधित रुग्णांचा आकडा  हा 359 वर गेला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. अमरावती महानगरपालिका तर्फे सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापणाऱ्या वर दंडाची कारवाई करण्यात येत आहे.

मास्क वापरणे,हात स्वच्छ धुणे आणि सामाजिक अंतर या त्रिसूत्रीचे गांभीर्याने तंतोतंत पालन करावे असे आव्हान जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.

Comments are closed.