Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिलासादायक! चंद्रपूर जिल्ह्यात आज एकही मृत्यु नाही, 52 कोरोनामुक्त तर 13 पॉझिटिव्ह

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

चंद्रपूर,दि. 25 जून : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असून बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. गत 24 तासात जिल्ह्यात 52 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर 13 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात शुक्रवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

बाधित आलेल्या 13 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 1, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 4, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, नागभिड 0, सिंदेवाही 0, मूल 2, सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 1, राजूरा 2, चिमूर 0, वरोरा 1, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 2 रुग्णांचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 618 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 82 हजार 591 झाली आहे. सध्या 503 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 47 हजार 706 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 60 हजार 382 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1524 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटनेच्या साखळी उपोषणास खास. अशोक नेते यांची भेट

नववधूने घरातील दागिने आणि रोकड लांबवत लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी प्रियकरासोबत केला पोबारा

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणारी एफ आर पी च्या धर्तीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव देण्याचा प्रयत्न करणार – सुनील केदार

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.