Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सिंदेवाही तालुक्यातील पांदन रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे निर्देश

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर दि. ४ एप्रिल: सिंदेवाही विभागात मनरेगा अंतर्गत सेल्फवर १७५ कामे असताना अद्याप एकही काम सुरू नाही ही बाब योग्य नसून वरील सर्व कामे तातडीने सुरू करण्याचे तसेच आमसभेच्या ठरावात नमूद केल्याप्रमाणे पांदण रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

सिंदेवाही तालुक्यातील विकास कामांचा आढावा काल पालकमंत्री वडेट्टीवार यांनी विश्रामगृह भवनात घेतला. यावेळी नगराध्यक्षा आशा गंडाटे, जिल्हा परिषद सदस्य रमाकांत लोधे, गट विकास अधिकारी कुणाल उंदीरवाडे, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सुप्रिया राठोड, नायब तहसीलदार धात्रक आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

२०१६-१७ पासून विभागातील घरकुलाचे कामे प्रलंबित असल्याबाबत पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करून घरकुलाची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी कृषी विभाग, पाणीपुरवठा, तांडा वस्ती सुधार योजना, स्वच्छ भारत मिशन, शिक्षण विभाग, एकात्मिक बाल विकास, धडक सिंचन विहीर योजना इत्यादी बाबत आढावा घेऊन अधिकाऱ्यांना दिशानिर्देश दिले.

राज्य पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार
राज्य शासनातर्फे सिंदेवाई तालुक्यातील मेंढा येथील दिनेश नामदेव शिंदे यांना कै. वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार-२०१९ तसेच पांढरवाणी येथील गुरुदास अर्जुन मसराम यांना कै. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार-२०१९ प्राप्त झाल्याबद्दल पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

बैठकीला विविध विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.