Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अज्ञाताकडून गायींची निर्घुणपणे कत्तल!… गोमांसासाठी कत्तल झाल्याचा अंदाज

Get real time updates directly on you device, subscribe now.

कत्तल झालेल्या दोन गायी अहेरी तालुक्यातील मोदुमडगु येथील विनोद पोचम भोयर तसेच रमेश दुर्गय्या तेलकरी यांच्या मालकीच्या असल्याचे कळते.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. ३ एप्रिल: अहेरी तालुक्यातील नागेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मोदुमडगु गावातील राणी राजकुंवर शाळेलगत दोन गायींची आज पहाटेच्या सुमारास अज्ञाताकडून निर्घुणपणे हत्या करण्यात आल्याचे निर्दशनास आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ही घटना आज सकाळच्या सुमारास गावकऱ्यांच्या निदर्शनास आली. सदर प्रकाराची माहिती तातडीने गावकऱ्यांनी नागेपल्लीचे सरपंच लक्ष्मन कोडापे यांना दिल्यानंतर लगेच त्यांनी या घटनेबाबत पोलीस स्टेशन अहेरीला कळविले. कत्तल झालेल्या दोन गायी मोदुमडगु येथील विनोद पोचम भोयर तसेच रमेश दुर्गय्या तेलकरी यांच्या मालकीच्या असल्याचे कळते.

प्रथमदर्शनी या गायींची कत्तल गोमांसासाठी झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे या परिसरात पुन्हा गो तस्कर सक्रीय झाले असल्याचे दिसून येत आहे. सदर घटनेची माहिती सरपंचाने कळवताच अहेरीचे पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे हे घटनास्थळी पोहचून सदर घटनेचा पंचनामा केला आहे. अज्ञात इसमावर भा.दं.वी. कलम ४२९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे, पोलीस हवालदार जगन्नाथ मडावी, सहाय्यक फौजदार यादव मेश्राम करीत आहे.  

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.