Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सायबर गुन्हेगारांची कोवीड लसीवर नजर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती, दि. ३० डिसेंबर:  कोरोना रोगावर प्रभावी असणारी लस शासनामार्फत कार्यक्रमानुसार दिली जाईल असे असले तरी लसपूर्वी त्याला तोतया कडून ऑनलाईन नोंदणीची ग्रहण लावण्याचा सपाटा सुरू आहे, त्यामुळे तातडीने याची गंभीर दखल घेत अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

मागील काही दिवसांपासून सायबर गुन्हेगार देशात सक्रिय झाले आहेत, इंटरनेटच्या माध्यमातून सोशल मीडियाचा वापर करून सामान्य जनतेची फसवणूक होत असल्याचा बर्‍याच घटना अलीकडच्या काळात उघडकीस आल्या आहेत, अशा तोतया कडून आता Covid-19 च्या काळात लस येण्यापूर्वी नोंदणीचे कारण पुढे करून नागरिकाकडून गोपनीय माहिती ओटीपी, ईमेल आयडी, आधार कार्ड, अशा डिटेल्स नागरिकांना विचारात असल्याची बाब अमरावती शहर पोलिसांना निदर्शनास आली आहे. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शासनाकडून सामान्य जनतेला कोणी त्रास देण्याकरिता ऑनलाईन लस मिळण्याकरिता फोन कॉलच्या माध्यमातून आधार कार्ड ओटीपी अथवा ईमेल आयडी यांची मागणी करण्यात येत नाही त्यामुळे कोणीही अनोळखी व्यक्ती अशी माहिती मागत असेल तर अशा नागरिकांना आपली गोपनीय माहिती देऊ नका. आधार कार्ड च्या नावाखाली ओटीपी शेयर झाल्यास आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामधून पैसे काढून फसवणूक होण्याची शक्यता आहे त्यामुळे वेळीच सतर्क राहा. असे आवाहन पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी केले आहे.

Comments are closed.