Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

निफाड तालुक्यातील “वंचित बहुजन आघाडी” चे कार्यकर्ते ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात

६५ पैकी ४० ग्रामपंचायतीमध्ये “वंचित” चे कार्यकर्ते उमेदवारी करणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नाशिक, दि. २९ डिसेंबर: निफाड तालुक्यातील चांदोरी येथील मिरालॉन्स मध्ये वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांची तातडीची महत्वाची बैठक तालुका महासचिव चांदोरी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग पगारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीस वंचित बहुजन आघाडी चे निफाड तालुका जेष्ठ नेते सचिन हिरे, वंचित बहूजन युवा आघाडी चे तालुका (युवा) नेते गणेश गांगुर्डे, भारतीय बौध्द महासभा निफाड तालुका अध्यक्ष मनोहर आहिरे, बहुजन रयत परिषदेचे जिल्हा नेते धनंजय जाधव, निफाड तालुका आदिवासी समाज एकता समिती चे प्रकाश बर्डे, सामाजिक कार्यकर्ते उत्तम निरभवने, महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीचे तालुका प्रमुख मास्टर राजेंद्र जाधव, निफाड तालुका मुस्लिम युवा फेडरेशन चे बबलू पठाण, रिपब्लिकन सेना महिला आघाडी जिल्हाध्यक्ष छायाताई निकम आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर बैठकीत वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार नाशिक जिल्हा अध्यक्ष पवन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला व तालुक्यात पक्षवाढीसाठी ‘’वंचित”‘  ची निफाड तालुका कार्यकारणी लवकरात लवकर पक्षश्रेष्ठींनी जाहिर करावी असा ठराव संमत करण्यात आला आहे.

बैठकीस जयवंत चाबुकस्वार,  सिध्दार्थ पवार, सुरज पगारे, कवी/गायक भारत साबळे, ओंकार गायकवाड, पप्पू गांगुर्डे, योगेश सोनवने,  प्रसाद कासार, धोंडीराम जाधव, जेष्ट नेते वाल्मिक जाधव, दौलत निफाडे, भारत कापसे, अभिजित आहेर, क्रुष्णमुर्ती पांडे, गोपीनाथ गांगुर्डे, बजरंग गांगुर्डे, राहुल चव्हाण, राहुल धोत्रे, भारती पवार, दिलिप कदम, ज्ञानेश्वर आहेर, अनिल बनकर, अतुल त्रुंगार, सागर सोनवने, पहिलवान देवेंद्र वाघ, संगेश गवळी, देवेंद्र गवळी, रमेश पवार, हेंमत बनकर, रविंद्र आठवले, विनोद लोंढे आदीसह असंख्य वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

बैठकीचे सुत्रसंचालन वंचित बहुजन आघाडी जिल्हा नेते सुप्रसिद्ध गायक सोमनाथ गायकवाड यांनी केले. तर आभार युवा नेते राहुल उन्हवने यांनी व्यक्त केले.

Comments are closed.