Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रायगड किनारपट्टीवर आज मध्यरात्री धडकणार चक्रीवादळ !

रायगड किनारपट्टीवरील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करण्यात येत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क     

रायगड : रायगड किनारपट्टीवर आज मध्यरात्री तौक्ते चक्रीवादळ धडकणार आहे. या वादळाचा तडाखा किती असेल हे सांगता येत नसल्याने नुकसान टाळण्यासाठी रायगड किनारपट्टीवरील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करण्यात येत आहे. किनारपट्टीला चक्रीवादळ धडकणार असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी आणि सखल भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, उरण तालुक्त्यातील 1600 लोकांचे स्थलांतर करण्यात आले असून त्यांना शाळा आणि इतर सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे, अशी माहिती रायगड जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वादळाबरोबरच रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होणार असल्याचं प्रशासनाने सांगितलं. यावेळी कुणीही घराबाहेर पडू नका, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

तौत्के चक्रीवादळाचा फटका आता रत्नागिरीच्या किनारपट्टीला बसतोय. रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर अंगावर थरकाप उडवेल असं वादळाचं रौद्ररुप बघायला मिळतंय. तसेच जवळपास चार ते पाच फुटांपर्यंत समुद्राच्या लाटा उसळताना दिसत आहेत. त्यामुळे समुद्राचं पाणी रस्त्यावर आलं आहे. रत्नागिरीच्या किनारपट्टी परिसरात ताशी ९० किमी वेगाने वारा वाहतोय. तौत्के वादळ आता गुजरातच्या दिशेला निघालं आहे, अशी माहिती समोर आली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

चक्रीवादळाने एक्सप्रेस ट्रेनवर झाड कोसळल्यानं रेल्वेसेवा ठप्प

(BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 567 जागांसाठी भरती

देशात प्रथमच महाराष्ट्राने आयोजित केली अभिनव ऑनलाईन वैद्यकीय परिषद

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.