Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बुलढाणा जिल्ह्यात घातक शस्त्रांची तस्करी करणाऱ्या रॅकेट सक्रिय

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

बुलढाणा, 9 जून-  बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीत धडक कारवाई करून एकच खळबळ उडवून दिली आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता गुन्हे शोध पथकाने संग्रामपूर तालुक्यातील टुनकी वसाली परिसरात छापा टाकून मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्र साठा जप्त केला आहे. या कारवाईत १४ देशी पिस्टल, २५ मॅगझीन, ८ जीवंत काडतूसे जप्त केली आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात घातक हत्यार तस्करीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तर बुलढाणा जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग फक्त घुटका कारवाई साठी च प्रसिद्ध असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. सोनाळा पोलिसांनी या कारवाईवर बोलने टाळले. यावेळी अटकेतील आरोपीच्या नातेवाईकांच्या घराची झडती घेण्यात आली. त्यादरम्यान यात मुख्य असलेला आरोपी तेरसिंग सिकलकार हा आढळून आला नाही. ठाणे पोलीसांनी घरजप्ती पंचनामा व फरार आरोपी तेरसिग यास हजर करण्यास निवेदन पत्र दिल्याची मोघम नोंद सोनाळा पोलीस स्टेशन मध्ये घेण्यात आली आहे.

ठाणे पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार मध्य प्रदेशातून ठाणे शहरातील राबोडी पोलीस स्टेशन हद्दीत घातक हत्यारांची तस्करीसाठी गेलेले रमेश मिसरीया किराडे वय २५, व मून्ना अमाशा अलवे वय ३४ रा. पाचोरी ता. दातपाडी जि. बऱ्हाणपूर (मध्यप्रदेश) या दोन्ही आरोपींना १ जूनला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३ देसी बनावटीचे पिस्टल, ६ मॅग्झीन व ४ जिवंत काडतुसे हस्तगत केली. यासंदर्भात राबोडी पोलीस स्टेशनला कलम ३,७,२५ भादवी सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), १२५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. ठाणे पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी विक्रीसाठी आणलेली १४ देसी पिस्टल, २५ मॅगझीन, ८ जीवंत काडतूस नातेवाईकांकडे लपवून ठेवल्याची कबूली दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ठाणे पोलिसांनी एका आरोपीला घेऊन थेट संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलीस स्टेशन गाठले. व हद्दीतील टूनकी वसाली परिसरातील गावात नातेवाईकांना माहिती न पडू देता घरात लपवून ठेवलेले घातक हत्यार जप्त केले. घराच्या झडतीत १४ देसी पिस्टल, २५ मॅगझीन, ८ जीवंत काडतूसे आढळून आले असून ठाणे पोलिसांनी जप्त केले आहे. ठाणे पोलिसांच्या या कारवाईने बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांवर व कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सदर कारवाई ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या गुन्हे शोध पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद रावराणे यांनी केली आहे. सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीतील टूनकी वसाली परिसरातील आदिवासी पट्ट्यात सर्व गूण्यागोविंदाने राहत आहेत. मात्र मध्य प्रदेशातील घातक हत्यार तस्करी करणारे या परीसराचे नाव धूळीस मिळवत आहे. अशा घटनांमुळे या परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

एटीएसच्या पथकाने केली होती मोठी कारवाई

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दिड वर्षापूर्वी १३ नोव्हेंबर २०२१ ला झारखंड ए टी एस च्या कारवाईत मध्यप्रदेशातील पाचोरी हे गाव अवैध हत्यार विक्रीचे केंद्र असल्याचे आढळून आले होते. तो धागा पकडत झारखंड दहशतवाद विरोधी पथकाने २० नोव्हेंबर २०२१ ला संग्रामपूर तालुक्यातील ग्राम टूनकी येथे मध्यप्रदेशातील तीन आरोपींना रंगेहात पकडून त्यांच्या कडून तब्बल १४ देशी पिस्तूल व १६० जिवंत काडतुसे जप्त केली होती. गत १८ महीण्यानंतर ठाणे पोलिसांनी सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीत धडाकेबाज कारवाई करीत घातक हत्यार जप्त केल्याने स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.घातक हत्यारांची तस्करी करणाऱ्या दोन्ही आरोपींना ठाणे न्यायालयाने १० जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हे पण वाचा :- 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.