Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आगीत होरपळून बालिकेचा मृत्यू

पुण्यात ऐन दिवाळीत दुर्दैवी घटना

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

 

पुणे,  22 ऑक्टोबर :- कोणतीही वेळ सांगून येत नाही. पण त्यातून मार्ग काढतांना प्रत्येकवेळी आपण यशस्वी होऊ असे नाही. आज अशीच एक आकस्मिक घटना पुण्यात घडली आहे. आनंदी क्षणाला दुःखाची किनार लागली आहे. एका ६ वर्षाच्या बालिकेचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. इकरा नईम खान असे घटनेत मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे.

राज्यात सर्व दिवाळीची धामधूम सुरु आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. या उत्साहाच्या वातावरणातच पुण्यात मात्र एक दुर्देवी घटना घडली आहे. एका सहा वर्षाच्या मुलीचा आगीत भाजल्याने मृत्यू झाला आहे. पुण्यातील भरवस्तीत असणा-या सदाशिव पेठेत एका हॉटेलास आज शनिवार सकाळी आग लागली. ही आग लागल्याचे समजताच अग्निशामक दल घटनास्थळी पाेहचले. अग्निशामक दलानं आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेत एक सहा वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली हाेती. तिला अग्निनशामक दलानं बाहेर आणलं.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यानंतर संबंधित मुलीला देवदूत वाहनातून तत्काळ उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. दरम्यान मुलगी गंभीर जखमी झाल्याने उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

T20 World Cup 2022: न्यूझीलंड- ऑस्ट्रेलिया आज एकमेकांशी भिडणार

FIPRESCI  संस्थेने सर्वोत्कृष्ट दहा भारतीय चित्रपटांची यादी केली जाहीर

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.