Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बिबट्याने हल्ला करून घेतला तरुणीच्या नरडीचा घोट

जांबुत गावातील दुसरी घटना, नरभक्षक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

  लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

शिरूर, 22 ऑक्टोबर :-  हिंस्त्र प्राणी नागरी वस्तीत येऊन नागरिकांवर हल्ला करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले असून स्वतः चे रक्षण स्वतःच करण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक उरलेला नाही. अशाच एका घटनेत बिबट्याने एका मुलीवर जीवघेणा हल्ला करून त्या मुलीचा जीव घेतला आहे.

शिरूर तालुक्यातील जांबुत येथे घरासमोर दबा धरून बसलेल्या बिबट्याने पूजा नरवडे या १९ वर्षीय तरुणीला फरफटत नेत तिच्यावर हल्ला केला होता. बिबट्याच्या हल्ल्यात सदर तरुणीचा मृत्यूही झाला. गेल्या काही दिवसांतील ही दुसरी घटना आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर नागरिकांनी आक्रोश व्यक्त करत पिंजरा लावण्याची मागणी केली होती. अखेर तब्बल १५ दिवसांच्या कालावधीनंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे. आज सकाळी ८ च्या सुमारास नरभक्षक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जांबूत परिसरातील जोरीमळा येथे  सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पूजा नरवडे ही कामानिमित्त बाहेर आली होती. मात्र जवळच दबा धरून बसलेला बिबट्या तिला दिसला नाही. बिबट्याने तिच्या अंगावर झेप घेत तिचा गळा पकडला. त्यानंतर बिबट्याने तिला उसाच्या शेतात २०० फूट अंतरापर्यंत ओढत नेले. ही बाब लक्षात येताच मुलीच्या आईने आरडा ओरडा केला. मदतीसाठी शेजारी राहणारे लोक धावूनही आले. माणसं येताना पाहतच बिबट्याने तरुणीला सोडून घटनास्थळावरून धूम ठोकली. मात्र बिबट्याच्या हल्ल्यात तिच्या मानेला खोलवर जखम झाल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला. जांबूत येथे हल्ल्याची ही दुसरी घटना आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आगीत होरपळून बालिकेचा मृत्यू

T20 World Cup 2022: न्यूझीलंड- ऑस्ट्रेलिया आज एकमेकांशी भिडणार

Comments are closed.