Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोलीस भरतीच्या नावाने तरुणांची फसवणूक !

तोतया पोलिसाला केली अटक

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

सोलापुर, 03, सप्टेंबर :- मी पोलीस आहे, पोलीस भरती करतो असे सांगून चार तरुणांकडून प्रत्येकी ६० हजार रुपयांप्रमाणे २ लाख ४० हजार रुपये घेतलेल्या भामट्याला वळसंग पोलिसांनी अटक केली आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

पोपट रामचंद्र चौगुले राहणार भाळवणी तालुका- मंगळवेढा असे नाव असून याने पोलीस खात्यात सेवेत नसताना पोलिसाचा गणवेश घालून तरुणांची फसवणूक केल्याची बाब पुढे आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पोपट चौगुले हा औज येथे काही दिवसांपूर्वी आला होता. गावातील रवी गेनसिद्ध जमादार, समर्थ अशोक भगत, आणि आकाश चंद्रकांत कोळी या तिघांना मी पोलीस आहे. तुमची पोलीस भरती करतो असे सांगून तिघांकडे प्रत्येकी ६० हजार रुपयांची मागणी केली. आणि या तरुणांचा मित्र फिर्यादी मलकारसिद्ध रमेश जमादार असे चार जणांकडून सुमारे २ लाख ४० हजार रुपये घेतले . तत्पूर्वी चौगुले याने पोलीस असल्याचे भासवण्यासाठी पोलीस वेषात तरुणांना व्हिडीओ कॉल केला होता. पोलीस असल्याने समजून विश्वासाने पैसे दिले , मात्र फसवणूक झाल्याचे समजताच वळसंग पोलीस ठाण्यात त्यांनी फिर्याद दिली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले, उपनिरीक्षक म्हाळप्पा सुरवसे यांनी या भामट्याला अटक केली.पुढे त्याला अक्कलकोट न्यायालयात उभे केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

हे देखील वाचा :- 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

“या” गावकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन मागे, पण समस्या न सुटल्यास उपोषणाचा इशारा ! 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.