Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“या” गावकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन मागे, पण समस्या न सुटल्यास उपोषणाचा इशारा ! 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

कोरची, दि. ३ सप्टेंबर : कोरची तालुक्याच्या कोटगुल क्षेत्रातील ४५ गावातील नागरिकांनी अनेकदा निवेदने देऊन सुद्धा समस्या सुटत नसल्याने शुक्रवारी सकाळी ८:३० वाजण्याच्या दरम्यान मुरूमगाव महावितरण कार्यालयापुढे छत्तीसगड-महाराष्ट्र राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

गुरुवारी सकाळी १०:३० वाजता महावितरण कार्यालयात अधिकाऱ्यांना घेराव टाकून समस्या सोडविण्यासाठी येथील नागरिकांनी मागणी केली होती. परंतु समस्या सुटत नसल्याने शेकडो नागरिक रात्रभर महावितरण कार्यालयापुढे तंबू ठोकून राहीले आणि सकाळी कोटगुल आठवळी बाजारपेठ व शेतीचे काम धंदे बंद ठेवून लहान मुलाबाळांसह नागरिकांनी राज्यमहामार्गावर चक्काजाम आंदोलनाची सुरुवात केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजभे, कुरखेडा उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे, कोरची तहसीलदार सोमनाथ माळी, नायब तहसीलदार बोदेले, धानोरा उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, गडचिरोली महावितरण प्रविभागाचे अधिक्षक अभियंता रवींद्र घाडगे, कार्यकारी अभियंता डोंगरावर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता शैलेश वासीमकर, धानोरा उपकार्यकारी अभियंता देशोपाल शेंडे, मुरूमगाव अभियंता चेतन लांडगे आंदोलनस्थळी पोहचले.

” हमारी मांगे पुरी करो च्या घोषणानी आंदोलनकर्त्या नागरिकांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनकर्त्या नागरिकांना आमदार कृष्णा गजभे यांनी आश्वासन देत म्हणाले की “कोटगुल क्षेत्राची मुख्य समस्या ढोलडोंगरी ३३ केव्ही उपकेंद्र उभारणाचे काम व कोटगुल येथे बीएसएनएल 4G चे टॉवर उभारणे पुढील सहा महिन्याच्या आत पूर्ण करणार”” आमदारांनी हमी दिल्यानंतर सात तास चाललेले चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात आले. तसेच बाकीच्या समस्या सोडविण्यासाठी कुरखेडा उपविभागीय अधिकारी निकाळजे व तहसीलदार सोमनाथ माळी यांनी कोरची तहसील कार्यालयात आठ दिवसात सभा आयोजित करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. आणि कोटगुल क्षेत्रात झालेल्या निकृष्ठ दर्जाचे कामाची पाहणी करण्यासाठी आमदार कोटगुल येथे ११ किंवा १२ सप्टेंबरला येणार असल्याचे येथील नागरिकांना सांगितले. यावेळी येथील नागरिकांनी आमदारांना असा इशारा दिला की सहा महिन्यात समस्या सुटली नाही तर आपल्या कार्यालयापुढे आम्ही सर्व नागरिक उपोषणाला बसू .

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सकाळी चक्काजाम आंदोलन सुरू असतांना मुरूमगाव येथील पोलीस उपनिरीक्षक गणेश आठवे चक्काजाम करणाऱ्या काही नागरिकांना जबरदस्ती उठवण्याचे प्रयत्न करीत होते परंतु आंदोलकारी नागरिकांनी कोणत्याही दबावाला न जुमानता आंदोलन सुरू ठेवले होते या चक्काजाम आंदोलनाला कोटगुल क्षेत्रातील सरपंच, लोकप्रतिनिधी, समाजसेवक सर्वपक्षीय नेते, व्यापारी व हजारो शेतकरी नागरिक आपल्या मुळंबाळा सह सर्व काम धंदे बंद ठेवून उपस्थित झाले होते.

हे देखील वाचा : 

जिल्हा परिषद आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले

कोविड बुस्टर डोजमध्ये गडचिरोली राज्यात तिसऱ्या क्रमांकावर

https://youtube.com/watch?v=7QurQi6KyCA&feature=share

 

Comments are closed.