Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्हा परिषद आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले

ऐन सणासुदीला कर्मचारी वेतना विना ...

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली 02 सप्टेंबर :- जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन अध्यापपर्यंत देण्यात आलेले नाही. वेतन वेळेवर न मिळत असल्याने कर्जाची रक्कम व्याजासह भरुन भुर्दंड सोसावा लागत आहे.वेतन न झाल्यामुळे कर्मचार्‍यामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शासन परिपत्रकानुसार ऑगस्ट महिन्याचे वेतन गणेश चतुर्थी पूर्वी देण्याचे शासनाचे आदेश आहेत . परंतु गडचिरोली जिल्हा आरोग्य विभाग अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन अजूनपर्यत झाले नाही, त्यामुळे कर्मचार्‍यांचा पोळा व गणेश चतुर्थी हे दोन्ही सण पगाराविना साजरे करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आरोग्य कर्मचारी कोविड 19 काळात कोरोना योध्दा म्हणून कोणत्याही प्रसंगी धावून गेला आहे. स्वतःच्या जीवावर उदार होऊन आरोग्य कर्मचाऱ्यांनी करोना रुग्णांना आरोग्य सेवा दिली आहे.असा हा सेवाभावी आरोग्य कर्मचारी आज वेतनाच्या प्रतिक्षेत आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

महिलेला मारहाण करणारा मनसे पदाधिकारी पदमुक्त.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.