Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महिलेला मारहाण करणारा मनसे पदाधिकारी पदमुक्त.

चौफेर टिकेनंतर मनसेची कारवाई..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 02, सप्टेंबर :- गणेशोत्सवानिमित्त मनसेच्या वतीनं शुभेच्छा देणारा बॅनर लावण्यावरुन पदाधिकारी आणि संबंधित महिला यांच्यात वाद झाला होता. मनसे पदाधिकारी विनोद अरगिले आणि संबंधित महिला यांच्यात वादावादी झाली. यातून विनोद अरगिले यांनी त्या महिलेला मारहाण केली. ही घटना २८ ऑगस्ट २०२२ रोजी घडली होती. या प्रकरणाचा व्हिडिओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर मनसेवर टीकेची झोड उठवण्यात आली होती. संबंधित महिलेच्या तक्रारीवरुन विनोद अरगिले यांच्याविरोधात पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला होता. मनसेच्यावतीनं विनोद अरगिले यांना पदमुक्त करण्यात आलं असून कारवाई कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या मारहाणीच्या व्हायरल व्हिडीओ वरून मनसेला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने टार्गेट केले होते. त्यामुळे पक्षाने कठोर भूमिका घेत कामाठीपुरा विभागातील उपविभाग अध्यक्ष विनोद अरगिले याला पदमुक्त केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

संपुर्ण सप्टेंबर महिना राष्ट्रीय पोषण माह म्हणून होणार साजरा.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सरपंच अडकला एसीबीच्या जाळ्यात.

Comments are closed.