Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

संपुर्ण सप्टेंबर महिना राष्ट्रीय पोषण माह म्हणून होणार साजरा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 02, सप्टेंबर :-  राज्यात राबविण्यात येत असलेल्या पोषण अभियानाचा जन आंदोलन हा महत्वाचा भाग आहे. 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2022 हा संपूर्ण महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक 1 ते 30 सप्टेंबर 2022 हा संपूर्ण महिना पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या वर्षी सप्टेंबर हा महिना “ राष्ट्रीय पोषण महिना ” म्हणून साजरा करण्याबाबत केंद्र शासनाचे निर्देशित केलेले असून सदर कार्यक्रमाला केवळ जनआंदोलनाचे स्वरुप न ठेवता लोकांचा सक्रिय सहभाग असणेकरीता केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे पोषण अभियानामध्ये विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. जेणेकरुन योजनेचं लाभार्थ्यांमध्ये पूर्व शालेय शिक्षण, आहार आरोग्य याविषयी जागृती निर्माण करता येईल.
पोषण महिना साजरा करण्यासाठी संपूर्ण देशपातळीवर केंद्र शासनाने सुचविलेल्या संकल्पनेवर आधारीत उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये स्वस्थ बालक-बालिका स्पर्धेचा देखील समावेश असून केंद्र शासनाकडून प्राप्त सदर स्पर्धेची रुपरेषा नुसार माहे सप्टेंबर 2022 मध्ये पोषण महिनासाठी पोषण पंचायतीना सक्रिय करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. गावपातळीवर सरपंच आणि ग्रामपंचायतीना पोषण माह मधील उपक्रमांचा मुख्य आधार /कणा बनवून जनआंदोलंनाचे लोकसहभागात रुपांतर करणे, तसेच ग्रामपंचायती आणि ग्रामपंचायतीच्या विविध स्थायी समित्यांच्या माध्यमातून पोषणाकरीता लोकसहभाग ही संकल्पना साकार होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे.
सप्टेंबर 2022 राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्याकरीता 4 प्रमुख संकल्पनेद्वारे राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्यात येणार आहे. महिला आणि स्वास्थ, बालक आणि शिक्षण- पोषणाबरोबर शिक्षण देखील, लिंग संवेदनशीलता, जलसंधारण आणि व्यवस्थापन, आदिवासी भागातील महिला आणि मुलांसाठी पारंपारीक खाद्यपदार्थ. विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पोषण माह रॅली, पोषण महीना उद्घाटन, पोषण प्रतिज्ञा, गरोदर व स्तनदा माता पोषण विषयी जागृती, किशोरी मुली व गरोदर माताची HB तपासणी, किशोरी मुली व गरोदर मातासाठी योग्य शिबीर घेणे, किशोरी स्पर्धा, विविधउपक्रम, गर्भवती महिलाकरीता पोषणावर आधारीत प्रश्न मंजुषा घेणे, आहारावर मार्गदर्शन, गरोदर व स्तनदा मातांना IFA गोळया वाटप करुन त्याविषयी माहिती देणे, माझी कन्या भाग्यश्री, मातृवंदना योजना, मिशन वात्सल्य विषयी मातांना माहिती देणे, किशोरी व मातांना वैयक्तीक स्वच्छतेविषयी माहिती देणे, पालक सभा घेणे, पुर्वशालेय शिक्षणावर मार्गदर्शन ( 3ते 6 वर्षे वयोगट) स्वस्थ बालक व बालिका स्पर्धा घेणे, वयोगट 6 महिने ते 3 वर्ष बालकांच्या पालकांची सभा घेऊन या वयागटातील विकासाचे टप्पे समजावून सांगने व घरी मुलांसोबत खेळ व संवाद साधणे यातुन होणाऱ्या विकासाचे महत्व सांगणे, बालकांची आरोग्य तपासणी, कुपोषणाच्या समस्येवर लक्ष केंद्रीत करणारी प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करणे, 0ते 6 वर्षे वयोगटातील सर्व मुलांचे वजन,उंची घेणे, पालक मेळाव घेऊन लिंग संवेदनशिल यावर मार्गदर्शन, स्थानिक सरपंच व सदस्य यांना मार्गदर्शनास उपस्थित ठेवणे,घराघरात शौच खड्डा या विषयी जनजागृती करणे, पावसाच्या पाण्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन कसे करता येईल या बद्दल जनजागृती, बेटी बचाओ बेटी पढाओ विषयी पालकांमध्ये जागृती घडवून आणणे, वैयक्तिक स्वच्छता मार्गदर्शन ओला कचरा व सुका कचरा व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन, स्थानिक सरपंच, सदस्य व नागरीकांचा मदतीने वृक्षारोपन कार्यक्रम घेणे, अंगणवाडी केंद्रांना परसबाग तयार करणे, बालकांकरीता विशेष आहाराच्या पाककृती करुन दाखविणे, अंगणवाडी सेविकांना मोह लाडू,चिक्की प्रशिक्षण आयोजित करणे, हात धुणे कार्यक्रम घेणे, पोषण माह समारोप कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. असे मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा परिषद गडचिरोली यांनी कळविले आहे.

हे देखील वाचा :-

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भाजप कॉंग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत…

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.