Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मध्य रेल्वेवर भीषण अपघात टळला; मोटरमनची सावधानता

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई, दि. ३ सप्टेंबर : मुंबापुरीतील चाकरमान्यासाठी लोकल सेवा ही जीवन वाहिनी आहे. आज सकाळी ऐन गर्दीच्या वेळी. सँडहर्स्ट रोड ते भायखळा दरम्यान हा अपघात मोटरमनच्या सतर्कतेमुळे टळला. लोकलसमोर लोखंडी ड्रम ठेवून घातपात करण्याचा डाव अज्ञातांचा होता. सँडहर्स्ट रोड – भायखळा या दरम्यान अज्ञातांकडून दगडाने भरलेला लोखंडी ड्रम रेल्वे रूळावर ठेवण्यात आला होता. पण मोटरमनच्या सावधानतेमुळे हा अपघात टळला असून अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सँडहर्स्ट रोड येथून भायखळाकडे जात असलेल्या लोकलने स्टेशन सोडताच रूळावर लोखंडी ड्रम दिसला. मोटरमन असलेल्या अशोक शर्मा यांनी आपत्कालीन ब्रेक लावत लोकल थांबवली आणि खाली उतरून हाताने ड्रम बाजूला केला. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. जर ट्रेन जास्त स्पीडमध्ये असती तर अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मोटरमनच्या कामगिरी मुळे अपघात टळल्यामुळे अनेकांकडून अशोक शर्मा यांचे कौतुक केले जात आहे. दरम्यान यामागे काही मोठा घातपाताचा कट होता का यासंदर्भात रेल्वे पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

महिलेला मारहाण करणारा मनसे पदाधिकारी पदमुक्त.

 

 

 

 

 

Comments are closed.