भारतीय सैन्य दलात कर्तव्यावर असलेले नायब सुभेदार गणेश श्रीराम फदाट यांचे हृदयविकारानं निधन
जालना, दि. २१ जानेवारी: भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जालना जिल्ह्यात येत असलेल्या जाफ्राबाद तालुक्यातील बोरगांव फदाट येथील नायब सुभेदार गणेश श्रीराम फदाट (४१) यांचे कर्तव्यावर असताना कमांड हॉस्पिटल सिकंदराबाद इथं आज सकाळी सव्वानऊच्या सुमारास हृदयविकारानं निधन झाले. त्यांचं पार्थिव आज रात्री विमानाने औरंगाबाद इथं येणार असून शुक्रवारी सकाळी ११ वाजता बोरगाव येथे शासकीय इतमातात अंत्यंस्कार करण्यात येणार आहेत. शहीद गणेश फदाट यांना देशसेवेची आवड असल्यानं त्यांनी सैन्यादलातला सेवा पूर्ण केल्यानंतरही परत सैन्य दलास विनंती करून सेवाकाल वाढवून घेतला होता. त्यांचा लहान भाऊ दिनेश फदाट हा देखील सैन्य दलात कार्यरत आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, असा आप्त परिवार आहे.
Comments are closed.