Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मातृशोक असतानाही उद्योग मंत्री श्री.सुभाष देसाई यांचे कोरोना रुग्णांसाठी कसोशीचे प्रयत्न सुरूच

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

दिप्ती अशोक वालावलकर

मुंबई २४ एप्रिल:-शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना मातृशोक झाला आहे. देसाई यांच्या आई कै.आंबिका राजाराम देसाई यांचे बुधवारी अल्पशा आजाराने रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९९ वर्षे होते. उद्योग मंत्री देसाई यांच्यावर दुःखद प्रसंग असतानाही राज्यात कोरोना ची गंभीर स्थिती असताना आईच्या निधनाचे दु:ख बाजूला सारून कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी कसोशीने प्रयत्न सुरूच ठेवले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

संपूर्ण जगभर थैमान घातलेल्या कोरोना माहामारीचा प्रादुर्भाव देशासह मुंबईतही दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईतील इतर भागाप्रमाणेच गोरेगाव येथेही अनेक रुग्णांना बेड आणि इतर आत्याधूनिक उपकरणं उपलब्ध होत नसल्याने आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे सुभाष देसाई यांनी ICU मधील रुग्णांना अत्यंत आवश्यक असलेल्या CARESTREAM VITA FLEX CR 45 PPH या उपकरणासाठी तात्काळ निधी उपलब्ध केला आहे. नेस्को संकुलाचे प्रमुख डॉ.अंद्रादे यांच्या विनंतीनुसार श्री देसाई यांनी रु.७,६७,२०० उपलब्ध करून दिले आहेत. सुभाष देसाई यांच्या या कर्तव्यदक्ष पणामुळे नेस्को संकुलाचे प्रमुख डॉ.अंद्रादे तसेच नागरिकांनी उद्योग मंत्री देसाई यांचे आभार मानले आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.