Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोरोना काळात तणावासह आजारांनाही दूर ठेवण्याचा सोपा मार्ग

तणाव हा आजार नसला तरी अनेक आजारांना आमंत्रण देणारी मानसिक स्थिती आहे. तणावावर उत्तम उपाय म्हणजे मेडिटेशन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई, डेस्क 24 एप्रिल:–  तुम्ही अनेक दिवसांपासून ताणतणावात असाल आणि त्यातून सावरण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुम्ही मेडिटेशनची मदत घ्यायला हवी. दररोज दिवसातले काही मिनिटं मेडिटेशनसाठी वेळ दिला तर आपल्याला दिवसभर तणाव आणि चिंतामुक्त राहण्यास मदत होते. मानसिक स्थिती स्थिर बनवते. त्याबरोबर आत्मशांती मिळते. त्यामुळेच मेडिटेशन थेरपी लोकप्रिय बनत चालली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महत्त्वाचं म्हणजे मेडिटेशनसाठी काहीही विशेष करण्याची आवश्यकता नाही. मेडिटेशनसाठी ठराविक जागेची गरज नसते. आपण कुठेही झोपून, अगदी प्रवास करताना, ऑफिसमध्ये बसल्याबसल्याही मेडिटेशन करू शकता. रेग्युलर मेडिटेशन केल्याने एन्जायटी, दमा, कॅन्सर, क्रॉनिक पेन, डिप्रेशन, हार्ट प्रॉब्लेम, हाय ब्लडप्रेशर, स्लीप डिसऑर्डर, टेन्शन, डोकेदुखी, नैराश्य यामध्ये बऱ्यापैकी आराम मिळतो.

दिवसभरातला ताण कमी करण्यासाठी मेडिटेशन फायदेशीर आहे. शरीरातले हार्मोनल बदल मानसिक आणि शारीरीक ताणावावर परिणाम करतात. तणावामुळे झोप न येणं, उदासीनता, चिंता आणि उच्च रक्तदाब अशा समस्या उद्भवतात. पण मेडिटेशनमुळे ताणतणावाची लक्षणे कमी होऊन चिडचिडेपणाही वाढतो. मेडिटेशन करून फोबिया आणि पॅनिक अटॅक ही तणावाची लक्षणं नियंत्रणात आणता येतात. मेडिटेशन म्हणजे ध्यान केल्याने चिंता दूर होऊन सकारात्मक विचार मनात यायला लागतात.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.