Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भाजप चे माजी खासदार दिलीप गांधी यांच्या निधनाने सुस्वभावी जवळचा मित्र हरपला – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. १७ मार्च – भाजप चे माजी खासदार माजी केंद्रीय जहाज वाहतूक राज्यमंत्री दिलीप गांधी यांच्या निधनाने माणुसकीचा महासागर; माणसातला माणूस सोज्वळ स्वभावाचे सुस्वभावी नेते आणि जवळचा मित्र हरपला आहे. अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी दिवंगत दिलीप गांधी यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली आहे.

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातुन दिलीप गांधी हे 3 वेळा निवडुन आले. दिवंगत माजी पंतप्रधान अटळ बिहारी वाजपेयी यांच्या सरकार मध्ये जहाज वाहतूक मंत्रालयाचे राज्य मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले होते. दिल्लीत नेहमी मला ते भेटत असत. त्यांचा स्वभाव अत्यन्त सोज्वळ होता.त्यांचे स्मितहास्य सुस्वभावीपणामुळे त्यांचे सर्वांशी मित्रत्वाचे संबंध होते.मला ते दिल्लीत नेहमी भेटत असत. माझ्याशी त्यांचे जवळचे मित्रत्वाचे संबंध होते.त्यांच्या अचानक निधनाने मला धक्का बसला. दिलीप गांधी यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुस्वभावी व्यक्तिमत्व हरपले असून अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय पटलावर चमकणारा तारा दिलीप गांधी यांच्या रूपाने निखळला आहे.त्यांच्या आठवणी मनामनात दीपस्तंभ होऊन कायम माणुसकीचा उजेड दाखवीत राहतील अशी आदरांजली ना. रामदास आठवले यांनी दिवंगत दिलीप गांधी यांना वाहिली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.