Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वेलकम फॉउंडेशन द्वारा आल्लापल्लीतील वार्डात जंतूनाशक फवारणी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आलापल्ली : आलापल्ली गावात दिवसेंदिवस वाढत्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्याकरिता वेलकम फॉउंडेशन कडून जंतूनाशक फवारणी करण्यात आली. कोरोनाला घाबरून न जाता सकारात्मक राहून हिंमतीने लढा देण्याचा संकल्प केला.

शनिवारी वार्ड क्रमांक १ मध्ये ज्या घरी कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्या ठिकाणी जंतूनाशक फवारणी करण्यात आली. तसेच जर कोणाच्या घरी कोरोना बाधित रुग्ण आढळले असेल त्यांना स्वतःच घर  सेनेटाइज (जंतू नाशक फवारणी) करून घ्यायचे असेल तर वेलकम फॉउंडेशन आल्लापल्लीशी संपर्क साधावा असे आवाहन वेलकम फौंडेशन तर्फे करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी वेलकम फॉउंडेशनचे अध्यक्ष स्वप्निल श्रीरामवार, उपाध्यक्ष मंगेश सलामे, सचिव नरेश मादेशी, सहसचिव सूरज सोनटक्के, कोषाध्यक्ष सौरभ तलांडे तसेच वेलकम फॉउंडेशनच्या सदस्यांची उपस्थिती होती.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

डीआरडीओमध्ये ७९ पदांवर संधी

सीडॅकमध्ये प्रोजेक्ट इंजिनीअर्स, असोसिएट्सच्या ४४ जागा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.