Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“एक कपडा एक करंजी” उपक्रमातून गरीब व गरजूंना वस्तूंचे वाटप.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

नाशिक, दि. १२ नोव्हेंबर:   गोरगरिब व रस्त्यालगत राहणाऱ्या लोकांमध्ये दिवाळी साजरी होत नाही. अशा व्यक्तीना दुजाभाव वाटू नये याकरिता सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे  यांनी “एक कपडा एक करंजी” या उपक्रमाच्या माध्यमातून गरीब व गरजूंना कपडे व फराळांचे वाटप केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दिवाळीत घरोघरी उत्साहाचे वातावरण असते. प्रत्येक कुटुंब ऐपतीप्रमाणे दिवाळीचा आनंद साजरा करतात. पण गोरगरिब तसेच रस्त्यालगत राहणाऱ्या कुटुंबाना यापासून वंचित राहावे लागते. गोरगरिबांना किमान कपडे व गोडधोड मिळावे त्यांना दुजाभाव वाटू  नये म्हणून “एक कपडा एक करंजी” उपक्रम राष्ट्रवादी युवक काँग्रेसने हाती घेतला. सर्वसामान्य नागरिक दिवाळीला नवीन कपडे आवर्जून खरेदी करतो. तसेच प्रत्येक घरा-घरात दिवाळीत फराळ बनविण्यात येतो. नवीन कपडे खरेदी केल्यावर अपोआप जुन्या कपड्यांकडे दुर्लक्ष होते. हे जुने कपडे गरजवंताला उपयोगी पडतात.

या उपक्रमाअंतर्गत अनावश्यक परंतु चांगले कपडे व फराळ जमा करण्याचे आवाहन दानशूर व्यक्ती व पदाधिकाऱ्यांना करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत जमा झालेले कपडे व करंजी, चिवडा, चकली यासारख्या फराळ घेऊन शहरातील विविध भागातील गरजू व्यक्तींना तसेच मुलांना वाटप करण्यात आले. हा उपक्रम राबवून गरीब व गरजू नागरिकांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आल्याचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी यावेळी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी संदीप गांगुर्डे, राहूल कमानकर, अक्षय पाटील, नवराज रामराजे, सुनिल घुगे, संदीप खैरे, सागर बेदरकर, सचिन जोशी, प्रांजल सोनार, रोहित जाधव, अविनाश मालुंजकर, किरण सूर्यवंशी  आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.