Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आशा स्वयंसेविकांना राज्य सरकारकडून दिवाळीची मोठी भेट.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना २००० आणि ३००० रुपये राज्य सरकारने मोठी भेट दिली आहे. इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे दिवाळी सणापूर्वी राज्यातील सुमारे ७० हजार आशा भगिनींना वाढीव मोबदल्याचा लाभ मिळणार असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना जुलै ते ऑक्टोबर २०२० या कालावधीतील वाढीव मोबदला देण्यासाठी ५७.५६ कोटी रुपये वितरित करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी आज येथे दिली. यासंदर्भात आरोग्य विभागाने आज शासन निर्णय निर्गमित केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

 राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक या दोन्ही घटकांच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत. ग्रामीण आरोग्याचा त्या कणा आहेत. त्यांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात वाढ करण्याचा निर्णय दिनांक २५ जून २०२० रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना १ जुलै २०२० पासून प्रत्येकी २०००  व ३००० रुपये इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक यांना जुलै ते मार्च २०२० या कालावधीतील वाढीव मोबदला अदा करण्यास पावसाळी अधिवेशनात विधिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यास अनुसरुन वित्त व नियोजन विभागाने जुलै ते ऑक्टोबर या कालावधीचे ५७.५६ कोटीच्या अनुदान वितरणास मान्यता दिली आहे

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.