Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तुमची जागा आणि माझी जागा असं म्हणून खेचाखेची करू नका. पाच वर्षानंतर जेव्हा जनता आपल्याला विचारेल तेव्हा काय सांगणार ? हा कद्रूपणा आहे. मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना आवाहन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर कांजूर मेट्रोच्या मुद्द्यावरून निशाना साधला आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

.मुंबई डेस्क २० डिसेंबर :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर कांजूर मेट्रोच्या मुद्द्यावरून निशाना साधला आहे.कांजूर कारशेडच्या मुद्द्यावरून सुरू असलेला वाद राज्यातील जनतेच्या हिताचा नाही. हा विषय आपल्या प्रतिष्ठेचा करून खेचाखेची करू नका. हवं तर तुम्हाला कांजूर कारशेडचं श्रेय देतो. पण कद्रूपणा करू नका, हा कद्रूपणा सोडा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केलं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधताना कांजूर मार्गमध्ये होणाऱ्या कारशेडची आणि आरेमधील कारशेडची तुलना करत कांजूरमार्गमध्ये मेट्रो होणं किती योग्य आहे, हे अधोरेखित केलं. कांजूर मार्गा येथे होणाऱ्या मेट्रो कारशेडचा वाद हा जनतेच्या हिताचा नाही. त्याला आपल्या प्रतिष्ठेचा विषय करू नका. तुमची जागा आणि माझी जागा असं म्हणून खेचाखेची करू नका. पाच वर्षानंतर जेव्हा जनता आपल्याला विचारेल तेव्हा काय सांगणार? आडवाआडवी केली? खेचाखेची केली? हा कद्रूपणा आहे. तो सोडवायला हवा, असं सांगतानाच माझं विरोधी पक्षाला आवाहन आहे, या बसून चर्चा करून प्रश्न सोडवू. तुम्ही हा प्रश्न सोडवा. तुम्हाला श्रेय देतो. इथे माझ्या इगोचा प्रश्न नाही. तुमच्याही इगोचा प्रश्न असता कामा नये, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

Comments are closed.