Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चिमुकल्यांनी वृक्षारोपण करत राबवले अनोखे अभियान

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पालघर 6 डिसेंबर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालघर शहरात चिमुकल्यांनी वृक्षारोपण करत अनोखे अभियान राबवले. यावेळी चिमुकल्यांनी झाडांचे रक्षण व पालन पोषण करण्यासंदर्भात शपथ घेत वृक्षारोपण केले.

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांची आवश्यकता कशी आहे याचे महत्त्व पटवून देत, झपाट्याने होणारी वृक्षतोड आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या याचं मुलांना ज्ञान असावं यासाठी पालघरच्या रिलायबल कॉम्प्लेक्स येथे सोसायटीचे चेअरमन मोहम्मद हुसेन खान, सेक्रेटरी सलीम शेख, खजिनदार, इक्राम खान, कय्यु शेख, सलामुल्लाह खान, अश्रफ पटेल, साबीर शेख, जुबेर शेख यांच्या मार्गदर्शनात हे वृक्षारोपण अभियान राबवण्यात आले. यावेळी चिमुकल्याने मोठ्या उत्साहात वृक्षारोपण केले, आणि त्यांनी लावलेल्या या रोपट्यांचे संगोपन देखील करणार असल्याची शपथ मुलांनी घेतली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.