Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धान मळणी करताना आग लागून ट्रॅक्टर व मळणी यंत्रासह 4 एकरातील धाणाचा ढीग जळून खाक

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

भंडारा 19 नोव्हेंबर :-  धान् पिकाच्या मळणीसाठी धानाच्या ढिगाला ट्रॅक्टर लावून धान् मळणी यंत्राद्वारे मळणी करीत असताना अचानक ट्रॅक्टरला लागलेल्या आगीत ट्रॅक्टर व मळणी यंत्र सह 4 एकरातील धान्य पिकाचे ढीग जळून खाक झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्या अंतर्गत येणाऱ्या सरांडी बुजरुक येथेल घडली असुन शेषराव समरीत असे नुकसान ग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे । तर दिनेश ठाकरे यांचे या घटनेत धान मळणी यंत्र व ट्रॅक्टर जळून खाक झाले आहे धक्कादायक बाब म्हणजे लाखांदूर तालुक्यातील एकाच आठवड्यातील ही दुसरी घटना घडली असुन या आधी 12नोव्हेंबर ला तालुक्यांतील रोहनी येथील आनंदराव समरित यांच्याही शेतातली 4 एकर क्षेत्रातील धानाचे पुंजणे पूर्णतः जळून धान मळणी यंत्र अंशतः जळले होते.

आज सकाळी धान मळणी करण्याकरिता समरीत यांनी दिनेश ठाकरे यांच्या धान मळणी यंत्रणा व ट्रॅक्टर यास भाड्याने घेऊन धानमळणी करिता नेले. धान मळणी सुरू असताना अचानक ट्रॅक्टरच्या इंजिन ने पेट घेतला क्षणातच आगीच्या वनवा पेटला आणि संपूर्ण धानाचा ढिगारा आगीच्या भक्षस्थानी आला. यात धान उत्पादक शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली असता घटनास्थळी ग्रामस्थ जमा होऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र आगीवर नियंत्रण करता आले नाही. सदर घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेच्या पंचनामा सुरू केला आहे. . पिढीत शेतकऱ्याने या प्रकरणी शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.