Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चिंदर गाव गेलंय तीन दिवस सुट्टीवर…

गेली ६०० वर्षाची ही गावपळण परंपरा चिंदर गाव जपतेय..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

सिंधुदुर्ग 19 नोव्हेंबर :- तुम्ही केव्हा ऐकलय का गाव सुट्टीवर जात ते पण तसं घडतंय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील चिंदर गावात. गेली ६०० वर्षाची ही गावपळण परंपरा आजच्या विज्ञान युगातही जपली जातेय केवळ देवाच्या कौलाने चिंदर गाव सुट्टीवर गेलंय.

कोकणची एक अनोखी आणि आगळी वेगळी परंपरा म्हणजे ‘गावपळण’. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील चिंदर गावात ही परंपरा सुरू आहे.श्रीदेव रवळनाथाच्या कौलाने दर तीन वर्षांनी मोठ्या उत्साहात चिंदर गावची गावपळन ही परंपरा सुरू होते. चिंदर गावात गावपळणीला दुपार नंतर सुरवात होते. गावकरी गुराढोरांसह तीन दिवस वेशीबाहेर जायला निघतात व गाव निर्मनुष्य होतो. तीन दिवसांनी देवाचा कौल घेऊन पुन्हा सर्वांचा गावात प्रवेश होतो आगळ्यावेगळ्या गावपळण परंपरा आजच्या विज्ञान युगातही जपली जातेय हे विशेष.आज या गाव पळणला सुरुवात झाली आहे.देवाने कौल दिला आणि गावकरी गाव सोडून वेशीबाहेर राहुट्या (झोपड्या) उभारून राहतात. तीन दिवस तीन रात्री भजन फुगड्या खेळत मजेत आनंदाने घालवतात.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या चिंदर गाववासियांच्या. या गावात ५ ते ७  हजार लोकसंख्या आहे. सर्व धर्मीय या परंपरेला मानून गावपळण प्रथेमुळे गाव सुट्टीवर आहे.शके सोळाशेपासून ही परंपरा जपली जातेय या गावपळणमध्ये विशेष म्हणजे सर्व बाहेरगावी असलेले नातेवाईक येतात
गावपळणवर महिला यांनी विशेष कविता ही गुणगुणतात आम्ही साऱ्या जणी चिंदर गावच्या मुली …गावच्या सुना ….अस नाव म्हटलं जातेय…..

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.