Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दारूमुक्त निवडणुकीसाठी मुलचेरातील ४३ गावांचे प्रयत्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुलचेरा, दि. १९ जानेवारी: गाव विकासासाठी दारूमुक्त निवडणूक गरजेची आहे. यासाठी तालुक्यातील ४३ गावांनी पुढाकार घेत ‘ग्रामपंचायत निवडणूक-दारूमुक्त निवडणूक’ करण्याचा ठराव घेतला आहे. निवडणुकीदरम्यान उमेदवारांना दारूचे वाटप करू देणार नाही, नशेत मतदान करणार नाही. असा निर्धारही या गावांनी केला आहे. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी या गावांनी प्रयत्न सुरु केले आहे. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विधानसभा व लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यंदाची ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा दारूमुक्त करण्यासाठी गावागावात ठराव घेऊन प्रयत्न केल्या जात आहे. निवडणुकी दरम्यान दारूचे वाटप होण्याची शक्यता असते. यावर नियंत्रण ठेवत दारूमुक्त निवडणूक करण्यासाठी तालुक्यातील ४३ गावांनी ठराव घेतला आहे. तुमरगुंडा, मुकली, रेंगेवाही, लोहारा, कोठारी, कोपरअल्ली माल,  गोविंदपूर, हरीनगर, हेटळकसा, सुंदरनगर, श्रीरामपूर, कोळसापूर, गणेशनगर, बंदूकपल्ली, देशबंधूग्राम, सुरगाव, अदांगेपल्ली, देवदा, कोलपल्ली, टिकेपल्ली, मथुरानगर, उदयनगर, तरुणनगर, भगवंतनगर, विश्वनाथनगर, विजयनगर, भवानीपूर, देवनगर, धनुर, कांचनपूर, आंबटपल्ली, चिचेळा, नागुलवाही, मच्छीगटा,अडपल्ली माल, अडपल्ली चक,  कोडीगाव,  गोमणी,  गीताली,  लगाम, खुदिरामपल्ली, लक्ष्मीपुर, गांधीनगर या ४३ गावांनी ग्रामपंचायत निवडणूक-दारूमुक्त निवडणूक करण्यासाठी ठराव घेतला आहे.

Comments are closed.