Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वीज नसताना चक्क दिले विद्युत बिल;महावितरणचा अजब गजब कारभार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती, दि. ८ मार्च: राज्यातील अधिवेशना अगोदर कोरोना काळात विद्युत तोडणीची मोहीम सुरू होती. आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी त्रस्त असताना विद्युत देयके भरायची कशी हा प्रश्न नागरिकांच्या समोर असतांना अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात विद्युत नसताना देखील त्यानां वीजबिल दिल्याने महावितरणचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील वृद्ध शेतकरी सुधाकर टेकाडे यांनी त्यांच्या शेतातील विहिरीवर विद्युत कनेक्शन जोडण्याकरिता २०१६ साली अर्जदाखल केला. २०१७ मध्ये त्यांचा अर्ज मंजूर केला गेला. डिपॉझिट रक्कम सुद्धा भरणा करण्यात आली. तरी देखील त्यांना विद्युत मिळाली नाही. दरम्यान त्यांनी अनेकदा महावितरणकडे विनवणी केली. मात्र त्याना विद्युत दिली नाही मात्र चक्क त्यांच्या हातात महावितरणने विद्युत बिल त्यांच्या हाती १० हजार ३०० रुपयांचा बिल देण्यात आला त्यावेळी टेकाळे यांनी शेतात वीजच नाही तर वीजबिल कशाचे असा प्रश्न उपस्थित केला आणि यासंदर्भात तक्रार दिली त्यांनतर हा सर्व महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर समोर आला आहे. १५ दिवसात शेतात विद्युत मिळाली नाही तर महावितरण समोर उपोषण करण्याचा इशारा यावेळी सुधाकर टेकाडे यांनी महावितरणला दिला आहे. शेतकऱ्याचा पिका विना कर्ज बाजरी असताना महावितरण गलथान कारभार करून आपलीच मुजोरी करताना दिसते . 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.