Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आत्मविश्वासाने आव्हानांचा सामना करा – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती, दि. ८ मार्च: प्रत्येकात शक्ती असते कुणीही दुर्बल नसतो. त्यामुळे आव्हानांना घाबरून जाण्यासारखे काही नसते. महिला भगिनींनीही आपली शक्ती ओळखून आत्मविश्वासाने आव्हानांचा सामना करत त्यावर मात केली पाहिजे, अशा शब्दांत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.   ‘चुझ टू चॅलेंज’ ही यंदा आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम आहे. त्यानिमित्त समस्त महिला भगिनींना शुभेच्छा देताना पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की,  प्रत्येकात निश्चित कुठलीतरी शक्ती असते. त्यामुळे अन्याय कधीही सहन करता कामा नये.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आत्मविश्वासाने व खंबीरपणे त्याचा प्रतिकार केला पाहिजे. महिलाभगिनींनी सतत व्यक्त झाले पाहिजे.  ‘तुम्ही जगाकडे पाठ करा, अख्खे जग तुमच्या पाठीशी राहील’ असे एक वचन आहे. त्यानुसार आत्मविश्वासाने व्यक्त झाले पाहिजे व अन्यायाचा वेळीच प्रतिकार केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

Comments are closed.