Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वीज बिलात सवलत देण्याची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी परस्पर करायला नको होती. अशोक चव्हाण..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क २७ नोव्हेंबर: राज्यातील वीज ग्राहकाना बिलात सवलत देण्याची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी परस्पर करायला नको होती. याबाबत त्यांनी राज्याची आर्थिक स्थिती पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करायला हवी होती, असे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकामंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

नितीन राऊत यांनी वीज बीलात सवलत देण्याची घोषणा करताना घाई केल्याची अप्रत्यक्ष कबुली अशोक चव्हाण यांनी दिली आहे. महाविकास अघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या खात्यांना निधीच दिला जात नाही, अशी तक्रार होत आहे. वीज बिलात सवलतीची घोषणा करुनही काँग्रेसकडे असलेल्या ऊर्जा खात्याला निधी मिळाला नसल्याचे विचारल्यानंतर त्यांनी हे विधान केले. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नितीन राऊत यांनी वीजबिलात सवलत देण्याची घोषणा करताना घाई केली. त्यांनी पक्षात आणि सरकारमध्ये घोषणा करण्याआधी चर्चा करायला हवी होती. तसे झाले नाही, ही आमच्याकडून चूक झाली, अशी कबुली मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

Comments are closed.