Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

स्वातंत्र्याच्या 73 वर्षांनंतरही सूलशेत गाव मूलभूत सुविधांपासून वंचित.

Get real time updates directly on you device, subscribe now.

श्रमजीवी संघटनेच्या पाठपुराव्यामुळे गावात पहिल्यांदाच अवतरले सरकारी अधिकारी.

श्रमजीवी संघटना आणि अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या संवेदनशीलते मुळे गावकऱ्यांनी मानले आभार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पालघर, दि. 4 डिसेंबर: पालघर तालुक्यातल्या खैरे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेले सुलशेत हे गाव स्वातंत्र्यानंतर ७३ वर्षा उलटुन देखील मुलभुत सुविधांपासून वंचित आहे. या गावात रस्ता, विज,पाणी,शाळा तसेच अंगणवाडी सुद्धा नाही. श्रमजीवी संघटनेचे तालुका अध्यक्ष दिनेश पवार यांनी गावाची दयनीय स्थिती पालघर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रशेखर जगताप यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यांनी हा विषय अतिशय संवेदनशिल पणे व गांभीर्याने घेऊन सुलशेत गावाला भेट देण्याची तयारी दर्शवली, त्याप्रमाणे गुरुवारी पहिल्यांदाच या गटविकास अधिकाऱ्यांसह, बाल विकास प्रकल्प अधिकारी, शिक्षण, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम असे सर्व विभागाचे अधिकारी या गावांमध्ये पोहोचले. आणि गावातील परिस्थितीचा आढावा घेऊन शक्य तेवढ्या लवकरात लवकर गावातील मूलभूत प्रश्न सोडविण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पालघर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. चंद्रशेखर जगताप, पाणी पुरवठा उप अभियंता श्री.कुलकर्णी व श्री. गायकवाड ,विस्तार अधिकारी श्री.उमतोल,शिक्षण विभागाचे श्री. संखे, बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती. धुमाळ ,खैरे ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी असे सर्व अधिकार गुरुवारी सकाळी 7:00 वाजताच सुलशेत गावाची पहाणी करण्यासाठी आले होते. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग पासून खैरे गावापर्यंत रस्त्याची व्यवस्था आहे, परंतु खैरे गावा पासून पुढे सुलशेत गावापर्यंत पर्यंत या अधिकाऱ्यांना पायी चालत, जंगलातून वाट काढत गावात पोहोचावे लागलं.

सुलशेत गावात पहिल्यांदाच एवढे सरकारी अधिकारी पाहून गावातील नागरिक देखील अचंबित झाले होते. यावेळी गावातील महिलांनी अधिकाऱ्यांना ओवाळून त्यांचे स्वागत केले. गावाच्या एका बाजूला धरणे आणि दुसऱ्या बाजूला डोंगर. परंतु गावात पिण्याच्या पाणीपुरवठ्याची सोय नाही. रस्ता नाही, वीज पुरवठा नाही, त्यामुळे आलेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ गावात मिनी अंगणवाडी सुरू करण्यासाठी सुचना दिल्या, तसेच पाणी पुरवठ्यासाठी बंद पडलेलं सौर उर्जेचे पँनलत्वरीत दुरुस्ती करण्याचे आदेश दिले,रस्त्याचे थांबवलेले काम तात्काळ सुरू करण्यासाठी बांधकाम विभागला सुचना केल्या.

श्रमजीवी संघटनेमुळे आज गावात खऱ्या अर्थाने सरकार अवतरले. त्यामुळे गावकऱ्यांनी श्रमजीवी संघटनेचे तालुका अध्यक्ष दिनेश पवार यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी तसेच, आलेले सर्व सरकारी अधिकारी यांचे आभार मानले. यावेळी गावात मूलभूत सुविधा उपलब्ध होणार याबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.

क्रिकेटचा खेळ मांडला कार्यालयीन वेळेत कार्यालया समोर. नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित असलेल्या अल्लापल्ली विभागीय कार्यालयातील धक्कादायक प्रकार.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.