Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गजानन कीर्तिकर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी

खासदार गजानन किर्तीकर यांचा बाळाहेबांची शिवसेना गटात पक्षप्रवेश.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 12 नोव्हेंबर :- उद्धव ठाकरे यांना त्यांच्या बालेकिल्ल्यामध्येच आणखी एक धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे नेते गजानन कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. कीर्तिकर यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे कीर्तिकर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच त्यांचे नेतेपदही काढून घेण्यात आले आहे.

गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाने तात्काळ पत्रक काढून कीर्तिकर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचं स्पष्ट केलं. कीर्तिकर यांचं शिवसेना नेतेपदही काढून घेण्यात आल्याचं ठाकरे गटाने म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त आजच्या दैनिक सामनातही देण्यात आलं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गजानन कीर्तिकर यांचा मुलगा अमोल कीर्तिकर अद्याप उद्धव ठाकरेंसोबतच आहेत. अमोल कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाला आपला पाठींबा ठाम ठेवला आहे. त्यामुळे येत्या काळाता वडील आणि मुलगा यांच्यात राजकीय लढत पाहायला मिळणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दरम्यान, काल प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी खासदार राहुल शेवाळे, माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम आणि खासदार भावना गवळी यांच्यासह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

हे पण वाचा :-

 

Comments are closed.