Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिवंत विद्युत ताराच्या स्पर्शाने शेतकऱ्याचा मृत्यू.

दुर्लक्षित करणार्‍या वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी कुटुंबीयांची मागणी..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गोंडपिपरी दि,१६ जुलै :-तालुक्यात येत असलेल्या सकमुर(चेकबापूर) येथील शेतकऱ्याचा जिवंत विद्युत ताराला स्पर्श झाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. राजेश्वर मोतीराम तोहगावकर (५५) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. मागील दोन महिने आधी नैसर्गिक आलेल्या वादळ वाऱ्याने सकमूर परिसरातील विद्युत खांब वाकले असल्याने तारा लोमकळत असल्याची तक्रारही वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यामार्फत कार्यालयात दिली होते. मात्र विद्युत वीज वितरण कंपनीच्या अक्षम्य दुर्लक्ष दुर्लक्ष केले वारंवार तक्रार देऊनही लोमकळत असलेल्या विद्युत तारा खांब उभे केले नसल्याने दैनंदिन शेतीच्या कामाला जाणाऱ्या शेतकऱ्याला जिवंत विद्युत तारेचा स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

वीज वितरण कंपनीचे कर्मचारी सदैव आपल्या कर्तव्यात कसूर करत असून त्याचे भुक्तान आज शेतकऱ्याच्या मृत्यूने झाल्याने कर्तव्यात निष्काळजी करणाऱ्या महावितरण च्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून बडतर्फ करण्यात यावं अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य अशोक रेचनकर मृतकाच्या परिवारातील कुटुंबियासह गावकऱ्यांनी केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर घटनेची माहिती गावकऱ्यांना होताच वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यासह अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला असून जेव्हा पर्यंत महावितरणचे अधिकारी घटनास्थळी येत नाही तेव्हापर्यंत मृत शरीर उचलणार नाही अशी ठाम भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे. मृतक राजेश्वर तोहगावकर यांच्या पच्यात दोन मुले, पत्नी असून तोहगावकर यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून सर्वत्र गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे देखील वाचा :- 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

धक्कादायक: महाराष्ट्रात १७ महिन्यांत तब्ब्ल २२ हजार ७५१ बालमृत्यू. https://loksparsh.com/top-news/information-comes-out-in-rti-by-samarthan-of-highest-child-deaths-in-maharashtra-state/27615/

गडचिरोलीत महा भयावह विदारक पूरस्थिती ….

Comments are closed.