Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अखेर शेतकऱ्यांनी तहशिल कार्यालयात नेलेल्या धानाची खरेदी

गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम याच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला यश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

आरमोरी, दि. १४ जुलै : यावर्षीच्या रब्बी हंगामामध्ये धान पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले होते त्यातच खरीप हंगामामध्ये खरेदी केलेल्या माल अद्यापही प्रशासनाने उचल न केल्यामुळे खरेदी विक्री सहकारी संस्थेला गोडाऊन ची कमतरता भासू लागली आहे दरम्यान धान विक्री करण्याची मुदत फक्त दोन ते तीन दिवसावर येऊन ठेपली असल्याने शेतकऱ्यांचा घरी पडून आहे.

या बाबीची दखल घेत गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी धान विक्री साठी चक्क तहसील कार्यालयात आणल्याने तहसीलदार यांनी तोडगा काढत गोडाऊन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यावरुन जिल्हा मार्केटिंग अधिकारी विश्वनाथ तिवाडे खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष मनोज मने यांनी अथक परिश्रम करून गोडावृन संदभात बाजार समितीचे सचिव अस्मित निमजे यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांचे हित जोपासुन आज दिनांक १४ जुलैला बाजार समितीचे आवारातील चाळ उपलब्ध करून दिल्याने अखेर खरेदी विक्री संस्थेने शेतकऱ्यांचा प्रश्वन सोडवृन प्रलंबित असलेला शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी केल्याने गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम याच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी तहशिल कार्यालयात धान विक्री नेलेल्या आज बाजार समितीत धानाची खरेदी केल्याने गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम याच्या प्रयत्नांना यश आले असल्यामुळे शेतकरी खरेदी विक्री संस्थेचे पदाधिकारी व गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांचे आभार मानले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये खरेदी केलेला माल शासनाने अद्यापही उचल केली नाही त्यामुळे गोडाऊन हाउसफुल अजूनही भरून आहेत त्यातच यावर्षी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात धान पिकाची लागवड केली होती त्यातच उत्पादनही मोठ्या प्रमाणात झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी एप्रिल व मे महिन्यात धान विक्री साठी खरेदी विक्री सहकारी संस्थेकडे ऑनलाइन नोंदणी केली होती त्यातच गोडाऊनची कमतरता संस्थेला भासू लागल्याने शेतकऱ्यांचा धान खरेदी करण्यासाठ अनेक अडचणीचा सामना करावा लागला.

या बाबीची दखल घेत गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेसचे सचिव दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आज बारा जुलैला तहसील कार्यालयात ट्राक्टर भरुण धान विक्री साठी नेऊन तहसीलदार कल्याण कुमार दहाट यांच्याकडे निवेदन देऊन गोडाऊन उपलब्ध करून प्रलंबित दोनशेच्यावरुण शेतकऱ्यांचे धान मुदतीच्या आत खरेदी करण्यात यावी.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अशी मागणी केली दरम्यान तहसीलदार कल्याण कुमार डहाट यांनी वरिष्ठांकडे चर्चा करून गोडाऊन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले यावरुन तहशिलदार कल्यानकुमार दहाट यांनी वरीष्ठ पातळीवर चर्चा करुण खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष मनोज मने यांना गोडाउन सोधण्याच्या सुचेना करुण बाजार समितीचे सचिव अस्मित निमजे यांच्याशी संपर्क साधुन जिल्हा मार्केटिंग अधिकारी विश्वनाथ तिवाडे खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष मनोज मने डा संजय ठेगरी ग्रेडर गोपाल ककटवार चर्चा करुन शेतकऱ्यांचे हित जोपासुन बाजार समितीचे सचिव अस्मित निमजे यांनी गोडाउन उपलब्ध करून दिल्याने खरेदी विक्री संस्थेनी शेतकऱ्यांचे प्रश्नन सोडवृन तहशिल कार्यालयात नेण्यात आलेल्या रब्बी हंगामातील प्रलंबित धानाची खरेदी आज दिनांक १४ जुलैला बाजार समितीच्या चाळीत खरेदी करण्यात आल्याने गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम याच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला यश येऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी तहशिलदार कल्यानकुमार दहाट जिल्हा मार्केटिंग अधिकारी विश्वनाथ तिवाडे खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष मनोज मने लम्क्षण कानतोडे व्यावस्थापक अक्षय माकडे ग्रेडर गोपाल ककटवार डा संजय ठेगरी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम याचे आभार मानले आहे.

हे देखील वाचा :

दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण: उपवनसंरक्षक शिवकुमारला अखेर सशर्त जामीन

एमपीएससीच्या परीक्षा, नियुक्त्या घेण्याच्या मागणीसाठी कराळे गुरुजींच्या नेतृत्वात आंदोलन

राष्ट्रीय ओबासी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक ओबीसी नेते प्राचार्य डॉ अशोक जिवतोडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश

Comments are closed.