Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बुद्धविहार जीर्णोद्धाराच्या बांधकामासाठी माजी आ.दिपकदादा आत्राम यांची आर्थिक मदत

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहेरी दि ११  :अहेरी येथील बुद्ध विहाराच्या जीर्णोद्धारासाठी भारत राष्ट्र समितीचे नेते,माजी आ. तथा आविस विभागीय अध्यक्ष दिपकदादा आत्राम यांनी पुढाकार घेऊन ज्ञानप्रसारक नवयुवक मंडळाच्या सदस्यांना नवीन बुद्ध विहाराच्या बांधकामासाठी आर्थिक मदत सुपूर्द केली आहे.

अहेरी शहरात बौद्ध समाज बांधवांची संख्या मोठ्या संख्येने असून या ठिकाणी बौद्ध समाज बांधवांतील उपासक व उपासिकांना एकत्र येऊन प्रार्थना करण्यासाठी जीर्ण झालेले खूप जुने बुद्ध विहार होते.
अहेरी येथील ज्ञानप्रसारक नवयुवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन जीर्ण झालेले बुद्ध विहार ला निर्लेखीत करून अहेरी शहरात भव्य बुद्ध विहार बांधकाम व सुशोभिकरण करण्याचे नियोजन करून काम सुरू केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या बांधकामाचा नियोजन विपुल प्रमाणात असल्याने  मंडळाचे सदस्यांनी भारत राष्ट्र समितीचे नेते माजी आमदार तथा आविस विभागीय अध्यक्ष दिपकदादा आत्राम यांची आलापल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन सुरू असलेले बुद्ध विहार बद्दल माहिती देऊन सहकार्याची विनंती केले असता माजी आ. दिपकदादा आत्राम यांनी तात्काळ आर्थिक करीत या समोरही बौद्ध समाजासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी ज्ञानप्रसारक नवयुवक मंडळाचे अध्यक्ष तथा मंडळ अधिकारी एकनाथ चांदेकर,ज्ञानप्रसारक नवयुवक मंडळाचे सचिव प्रशांत भीमटे, संजय ओंडरे,आविस शहराध्यक्ष मिलिंद अलोने आदि सदस्य उपस्थित होते .

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा,

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.