Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ठाण्यात गोळीबार,  एक जखमी

दोन गटांमध्ये संपत्तीच्या वादातून गोळीबार होण्याचा प्राथमिक अंदाज

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

ठाणे, 21 ऑक्टोबर :- ठाण्याच्या घंटाळी मंदिर रोड परिसरात आज पहाटे गोळीबार झाल्याने एकच खळबळ माजली आहे. या गोळीबारात एकजण जखमी झाला आहे. दोन गटांमध्ये संपत्तीच्या वादातून हा गोळीवार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, तपास सुरू आहे.

घंटाळे परिसरात पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास हा गोळीबार झाला आहे. हा दोन गटांमधील वाद असण्याची शक्यता आहे. संपत्तीच्या वादातून हा प्रकार झाल्याचं समजत आहे. ज्या व्यक्तीवर गोळीबार झाला, त्याच्यासोबत त्याचे सहकारीदेखील होते. आपल्या कार्यालयातून ते रात्रीच्या वेळी ते कंदील पुरवण्याचं काम करत होते. त्याचवेळी हल्लेखोर तिथे पोहोचले आणि गोळीबार केला. जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

घंटाळी परिसर हा नौपाडा या मध्यवर्ती भागामधील गजबजलेल्या भागांपैकी एक आहे. याच रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर राम मारुती रोड आहे. या भागामध्ये सध्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. घंटाळी मंदिराच्या मागील बाजूस शाळा असून काही अंतरावरच नौपाडा पोलीस स्थानक आहे. त्यामुळे अशा ठिकाणी गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आहेत. विशेषत: ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.