Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सीसीटीएनएस रॅकिंग मध्ये नांदेड जिल्हा पोलीस दल राज्यात प्रथम

सीसीटीएनएस प्रणालीत नांदेडचा दबदबा कायम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नांदेड, 21 ऑक्टोबर :- सीसीटीएनएस प्रणालीत नांदेडचा कायम दबदबा असून नांदेड जिल्हा पोलीस दलाची कारकीर्द नेहमीच चर्चेत राहिली आहे. दरम्यान नुकत्याच लागलेल्या सीसीटीएनएस रॅकिंगमध्ये नांदेड जिल्हा पोलीस दलाने राज्यात सतत दुस-या वेळेस प्रथम स्थान पटकावले आहे. यामुळे संपूर्ण राज्यात नांदेड जिल्ह्याची मान पुन्हा एकदा उंचावली आहे.

अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे, यांचेकडून पोलीस घटकांच्या सीसीटीएनएस कामगिरी बाबतचा आढावा दर महिन्यात घेण्यात येतो. राज्यातील सर्व घटकांचे सप्टेंबर – 2022 मधील सीसीटीएनएस मासिक कामगिरी अहवालांचे अवलोकन करुन देण्यात आलेल्या गुणांकनानुसार नांदेड जिल्हयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये नांदेड जिल्यातील ३६ पोलीस स्टेशन येथे दाखल होणारे प्रथम खबर, घटनास्थळ पंचनामे, आरोपी अटक, मालमत्ता जप्ती, दोषारोप पत्र, न्यायालयीन निकाल, हरवलेले इसम, अनओळखी मयत, अदखलपात्र खबर, गहाळ / बेवारस मालमत्ता, प्रतीबंधक कार्यवाही व ईतर नोंदी अश्या एकुण 18 प्रकारच्या माहितीची सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये वेळेत परिपूर्ण नोंदी करण्यात येतात. तसेच सीसीटीएनएस प्रणालीचा दैनदिन कामकाजात वापर करुन गुन्हे प्रतिबंध, गुन्हे उघडकिस आणुन चांगली कामगिरी करण्यात आली तसेच ITSSO, ICJS व Citizan Portal वरील e – Complaint, गणेश उत्सव, नवरात्र उत्सव यांची ऑनलाईन अर्जाची वेळेत निर्गती व प्रभावीपणे वापर केल्याने सप्टेंबर २०२२ मध्ये नांदेड जिल्हयाने २३२ गुणांपैकी २२७ गुण मिळवुन महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक आला आहे.

पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांचे मार्गदर्शनाखाली सीसीटीएनएस नोडल अधिकारी अपर पोलीस अधीक्षक नांदेड निलेश मोरे, अपर पोलीस अधिक्षक भोकर  विजय कबाडे व त्यांची सीसीटीएनएस टीम पोलीस उप निरीक्षक रहिम बशीर चौधरी, पोलीस उप निरीक्षक प्रणिता बाभळे, पोलीस नाईक समीरखान मुनीरखान पठाण, पोलीस नाईक ओंकार सुरेश पुरी, पोलीस कॉन्स्टेबल माधव नारायण येईलवाड यांचे परिश्रमामुळे नांदेड पोलीस दलाने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्यासाठी पोलीस अधिक्षक शेवाळे  यांनी सीसीटीएनएस विभागाचे कौतुक केले आहे, तसेच भविष्यातही अशाच कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

ठाण्यात गोळीबार,  एक जखमी

Comments are closed.