Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अनाधिकृत बांधकामांवर चालला बुलडोजर वसई-विरार महानगर पालिकेची धडक कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

विरार, 21, ऑक्टोबर :- अनधिकृत बांधकामांचे माहेर घर असलेल्या वसई-विरार महानगरपालिकेच्या “सी’ आणि ‘जी’ प्रभागात अनधिकृत बांधकांमावर महानगरपालिकेने तोडक कारवाई केली आहे . दिनांक १९ ऑक्टोबर, २०२२ रोजी मा.आयुक्त श्री.अनिलकुमार पवार व अति.आयुक्त आशिष पाटील यांचे निर्देशानुसार व उप-आयुक्त अजित मुठे यांचे मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती ‘सी’ चंदनसार व प्रभाग समिती ‘जी’ अंतर्गत अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

प्रभाग समिती ‘सी’ मधील सहकार नगर, रिक्षा स्टॅण्ड जवळ, विरार पूर्व परिसरातील ४००० चौ.फुट क्षेत्रफळ आर.सी.सी.बांधकाम केलेल्या व १८ सदनिका व ७ दुकाने असलेल्या G + ३ मजली अनधिकृत इमारतीवर प्रभाग समिती ‘सी’ चंदनसार चे प्र.सहा.आयुक्त  गणेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली निष्कासनाची कारवाई करून सदर इमारत भुईसपाट करण्यात आली. यावेळी अजित मुठे, उप-आयुक्त अतिक्रमण विभाग, प्र.सहा.आयुक्त  गणेश पाटील, अतिक्रमण विभाग प्रमुख विजय गोतमारे, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान व अतिक्रमण विभागाचा कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तसेच प्रभाग समिती ‘जी’ वालीव अंतर्गत अमन इंडस्ट्रीज, सातीवली गावदेवी मंदिरासमोर, वसई पूर्व या ठिकाणी ३२०० चौ.फुट क्षेत्रफळ आर.सी.सी.बांधकाम केलेल्या अनधिकृत गाळ्यावर प्रभाग समिती ‘जी’ वालीव चे सहा.आयुक्त श्रीम.धनश्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निष्कासनाची कारवाई करण्यात आली. यावेळी अजित मुठे, उप-आयुक्त अतिक्रमण विभाग, सहा.आयुक्त धनश्री शिंदे, कनिष्ठ अभियंता कल्पेश कडव, लिपिक विजय नडगे, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान व अतिक्रमण विभागाचा कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
मा.आयुक्त महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात होत असलेल्या अतिक्रमण, अनधिकृत बांधकामांवर नियमित कारवाई सुरु करण्यात आली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

सीसीटीएनएस रॅकिंग मध्ये नांदेड जिल्हा पोलीस दल राज्यात प्रथम

Comments are closed.