Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ओपिनियन आणि एक्झिट पोलला निवडणूक कालावधीत प्रतिबंध

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, दि 3 : भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा निवडणूक 2024 साठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध केला आहे.

राज्यात एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणुका होणार असून याअनुषंगाने 16 मार्च 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यात 19 एप्रिल रोजी सकाळी सात वाजेपासून 1 जून 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंतच्या कालावधीत एक्झिट पोल साठी प्रतिबंध लागू राहणार आहे.त्याचप्रमाणे प्रत्येक टप्प्यातील मतदान संपण्याच्या आधी 48 तासाच्या कालावधीत ओपिनियन पोल अथवा अन्य मतदान सर्वेक्षणाच्या परिणामांच्या प्रकाशन अथवा प्रसारणावर प्रतिबंध असेल, असे निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

रविंद्र चुनारकर यांना ‘साधना’ची प्रतिष्ठित तांबे-रायमाने अभ्यासवृत्ती जाहीर

लोकसभा मतदान अधिकाऱ्यांची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण; जिल्ह्यात ५००५ मतदान अधिकाऱ्यांची निवड तर २६८३ राखीव

Comments are closed.