Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“माँ कि रोटी”मिळणार माफक दरात

खेरवाडी सोशल वेल्फर महाराष्ट्र असोसिएशद्वारे आरमोरीत स्वयंसहायता बचतगटा मार्फत उपक्रम सुरू..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

खेरवाडी सोशल वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र  मार्फत (१२), उत्तर प्रदेश (१९), ओडिशा (२) आणि गुजरात, तेलगाना आणि मेघालय मध्ये प्रत्येकी एक अशा देशातील ६ राज्यांमध्ये ३६ स्वयंसहायता बचतगटानां काम देवून सुरु कर करण्याचा मानस आहे .

गडचिरोली ३ एप्रिल : आरमोरी शहरात स्वयंसहायता बचतगटा मार्फत गोरगरीब जनतेसाठी अतिशय माफक दरात “माँ कि रोटी” थाळी आज (दि, ३ एप्रिल) पासून सुरू करण्यात आले असून २० दर आकारण्यात येणार आहे. जेवणाच्या थाळीत गरमागरम ३ पोळी, भाजी, भात, वरण, यांचा समावेश असल्याने याचा फायदा शोषित, वंचित, निराधार, मजूर यांना लाभ होणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

“माँ कि रोटी” हा उपक्रम “माँ” फाउंडेशन स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (सीडीबी) च्या सहकार्याने खेरवाडी सोशल वेल्फेअर असोसिएशन मार्फत राबविण्यात येत असून देशभरातून गडचिरोली (महाराष्ट्र), औंधी (छत्तीसगड), सांबा (जम्मू-काश्मीर), गजपती (ओडिशा) आणि (पश्चिम जैंतता हिल्स) मेघालय या पाच राज्यात “माँ कि रोटी”  हा उपक्रारम राबविण्यात येणार आहे. 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर उपक्रम महाराष्ट्रातील गडचिरोली येथील आरमोरी शहरात स्वयंसहायता बचत गट निर्मिती करून सदर स्वयंसहायता बचतगटानां प्रशिक्षित करून स्वयंपाकाची जबाबदारी सोपवली असून आज पासूनच पहिला उपक्रमाचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. उर्वरित चार राज्यात सदर उपक्रम टप्याटप्यात राबविण्यात येणार असून यांचा फायदा गोरगरिबाला होणार असल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी सिडबी रांची चे व्यवसथापक प्रेमा होरो,  मुंबई चे एमए फाऊंडेशनचे कार्यक्रम प्रमुख तरंग मिश्रा, खेरवाडी सोशल वेल्फेअर असोसिएशन सहाय्यक संचालक विलास कांबळे, प्रिया बेहरे, महानंदा मोहुर्ले, जयकुमार भैसारे, सायली खडसकर, सुनील सोलारकर इत्यादी उपस्थित होते.

हे पण वाचा :-

 

Comments are closed.