Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रविंद्र चुनारकर यांना ‘साधना’ची प्रतिष्ठित तांबे-रायमाने अभ्यासवृत्ती जाहीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वनहक्क कायद्याचे अभ्यासक रविंद्र चुनारकर यांना जाहीर झाली आहे. रोख ५० हजार रुपये असे अभ्यासवृत्तीचे स्वरूप असून ‘गडचिरोली जिल्ह्यातील वनस्वराज्य : सतेच्या विकेंद्रीकरणाची चळवळ’ हा त्यांचा संशोधन अभ्यासविषय आहे.

गडचिरोली दि,२ एप्रिल : युवा अभ्यासकांना प्रेरणा व प्रोत्साहन देऊन उत्तम दर्जाचे लेखन मिळवण्यासाठी पुणे येथील नामांकित व प्रतिष्ठित साधना प्रकाशन तथा साप्ताहिक संयोजित प्रा.श्रीकांत तांबे व प्रा.ल. बा. रायमाने यांच्या स्मृतीपित्यर्थ ‘तांबे रायमाने अभ्यासवृत्ती’ राज्यातील तरुण अभ्यासकांना देण्यात येते. यंदाची ही प्रतिष्ठित अभ्यासवृत्ती गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ या अतिदुर्गम व ग्रामीण भागातील युवा सामाजिक कार्यकर्ते, वनहक्क कायद्याचे अभ्यासक रविंद्र चुनारकर यांना जाहीर झाली आहे. रोख ५० हजार रुपये असे अभ्यासवृत्तीचे स्वरूप असून ‘गडचिरोली जिल्ह्यातील वनस्वराज्य : सतेच्या विकेंद्रीकरणाची चळवळ’ हा त्यांचा संशोधन अभ्यासविषय आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

३५ वर्षापेक्षा कमी वयाच्या तरुण-तरुणींना देण्यात येणाऱ्या या अभ्यासवृत्तीसाठी राज्यभरातून १२० अर्ज आले होते. यात रविंद्र चुनारकर यांच्या प्रस्तावाची व करीत असलेल्या कामाची दखल घेत अंतिम मुलाखतीतून निवड करण्यात आली. समाजशास्त्राचे अभ्यासक असलेले मराठीतील आघाडीचे लेखक मिलिंद बोकील, अनिल गोरे, सुरेश गोरे, साधनाचे संपादक विनोद शिरसाठ या समितीने ही निवड केली आहे.

रविंद्र चुनारकर हे मागील १० वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात ग्रामिण विकास, पेसा, वनाधिकार कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलोशीप देखील मिळाली असून कुरखेडा तालुक्यातील अरततोंडी गावाला आदर्श करण्यात योगदान दिले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नामांकित टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत संशोधक म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वनस्वराज्याची संकल्पना देशाला दिशादर्शक ठरली. ग्रामसभा सक्षमीकरणातून जल-जंगल-जमीन संवर्धनासाठी चळवळ व संघर्ष करणा-या प्रेरणादायी घडामोडींचा दस्तावेज या अभ्यासवृत्तीतून मांडला जाईल. सदर संशोधन साधनातून प्रकाशित करण्यात येणार आहे.

हे देखील वाचा ,

शिक्षकानी अल्पवयीन विद्यार्थिनीला दोन पानी “प्रेम पत्र” देत केली छेडछाड

नवोदय परीक्षेमध्ये अहेरी प्रकल्पातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Comments are closed.