Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पेठा येथे माता मंदिर बांधकामासाठी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून आर्थिक मदत

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

अहेरी, 10 जून- अहेरी तालुक्यांतील पेठा (देचली) येथे जुन्या काळातील लाकडापासून तयार केलेले माता मंदिर आहे,गावातील प्रत्येक समाजाला आपल्या घरी शुभकार्य करायचे असल्यास ते सर्वात अगोदर माता मंदिरात पूजा करून आपले शुभकार्याची सुरुवात करतात. त्यात पावसाळ्यातील सणात माता मंदिरात पूजा करायला गावकऱ्यांना खूप त्रास सहन करावे लागत होते.म्हणून गावकऱ्यांनी व सर्व समाज बांधवांनी गावात एकत्र येऊन श्रमदान व लोकवर्गणीतून माता मंदिर बांधकाम करण्याचे ठरविले होते.

या निमित्याने पेठा (देचली) येथील प्रतिष्ठित ग्रामस्थांनी भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची त्यांच्या आलापल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन गावात माता मंदिर बांधकाम करायचे असून आपल्याकडून या सत्कार्याला सहकार्य करण्याची विनंती केली असता पेठा येथील ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी माता मंदिर बांधकाम करण्यासाठी आर्थिक मदत केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

माजी आमदार आत्राम आर्थिक मदत करतांना पेठा येथील प्रतिष्ठित व्यक्ती सुधाकरजी कलकोटवार,माजी सरपंच सत्यम वेलादी,अनिल कलकोटवार,नागय्या मूलकरी,धर्मय्या मूलकरी,हनमंतु मूलकरी,जुलेख शेख,विनोद कावेरी,संदिप बडगे,आविस सल्लागार विशाल रापेल्लीवर आदी उपस्थित होते. माता मंदीर बांधकामासाठी आर्थिक मदत केल्याने पेठा येथील गावकऱ्यांनी माजी आमदार आत्राम यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.