लोकस्पर्श न्युज नेटवर्क
पालघर, 10 जून – पश्चिम रेल्वेच्या विरार वैतरणा दरम्यान असलेल्या 90 क्रमांकाच्या रेल्वे पुलावर ओव्हरहेड वायर जाणारा खांब कोसळल्यामुळे गेल्या दोन तासापासून मुंबईकडे जाणारी लांब पल्ल्याची व लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे.
दुपारी दोन वाजेच्या सुमारास विरार वैतरणा दरम्यान असलेल्या कचराळी या 90 क्रमांकाच्या पुलावर ओव्हरहेड वायर नेणारा खांब मुळापासून खाली कोसळला.या घटनेआधी जोधपूर एक्सप्रेस गेल्याने अनर्थ टळला. या प्रकारामुळे ओव्हरहेड लाईनचा वीज पुरवठा पूर्णपणे खंडित करण्यात आला ओव्हरहेड वायर नेणारा खांब कोसळल्याची माहिती मिळताच पश्चिम रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर काम करण्यात येत आहे.
यामुळे गुजरात व डहाणू कडून जाणारी लोकल सेवा तब्बल दोन तासापासून पूर्णपणे ठप्प आहे तर मुंबईहून गुजरात कडे जाणारी रेल्वे सेवा काही वेळ उशिराने धावत आहेत, अशी माहिती डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या प्रतिनिधींनी दिली आहे.
हे पण वाचा :-
Comments are closed.