Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अरूणाचल मध्ये कोसळले लष्कारचे हेलिकाॅप्टर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अरूणाचल प्रदेश, 21 ऑक्टोबर :- अरूणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यात भारतीय सैन्याच्या हेलिकाॅप्टरला अपघात झाला असून हेलिकाॅप्टर कोसळल्याची माहिती मिळाली आहे. भारतीय सैन्यातील ध्रवु हेलिकाॅप्टर कोसळले असून बचाव कार्यासाठी पथक रवाना झाले असल्याची माहिती आहे. दरम्यान, अद्यापही या अपघातात जखमींबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. अरूणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यात तूूतिंग भागात ही दुर्घटना घडली आहे.

याच महिन्यात झाले होते हेलिकाॅप्टर क्रॅश

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अरूणाचल मध्ये हेलिकाॅप्टर क्रॅश होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याच महिन्याच्या सुरूवातीला ही अरूणाचल प्रदेशातील तमांगजवळ भारतीय लष्कराचे हेलिकाॅप्टर कोसळले होते. या अपघातात चित्ता हेलिकाॅप्टरमधील पायलटचा मृत्यू झाला होता तर दुसरा पायलट जखमी झाला होता. त्यावेळी अधिकार्यांनी माहिती दिली होती कि, तवांगजवळील फाॅरवर्ड एरियामध्ये उड्डाण करणारे आर्मी एव्हिएशन चिता हेलिकाॅप्टर 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वा. नियमित उड्डाण करतांना क्रॅश झाले. दोन्ही वैमानिकांना जवळच्या लष्करी रूग्णालयात नेण्यात आले असून तिथे पायलटचा मृत्यू झाला होता.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सीसीटीएनएस रॅकिंग मध्ये नांदेड जिल्हा पोलीस दल राज्यात प्रथम

Comments are closed.