Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोरोनाचा कमबॅक : ओमिक्राॅनच्या BF.7 मुळे वाढली चिंता

नवीन सबव्हेरियंट भारतात दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 21 ऑक्टोबर :-  जवळपास गेल्या अडीच वर्षांपासून जगभरात कोरोना महामारीने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या विविध लाटांमध्ये आतापर्यंत लाखों लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाची तीव्रता वाढल्यानंतर वेळोवेळी करण्यात आलेल्या लाॅकडाउनमुळे अनेकांची वाताहतही झाली. मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी केल्यानंतर मध्यंतरी कोरोना आजाराची तीव्रता कमी झाली होती. आता कोरोना महामारी जवळपास संपल्यात जमा आहे, असा समज नागरिकांनी करून घेतला होता. भारतामध्ये तर आता कोरोनाचे नियमही पूर्णपणे शिथिल करण्यात आले आहेत. या दरम्यान, कोरोनाने आता पुन्हा एकदा कमबॅक केल आहे. भारतासह संपूर्ण जगात कोरोनाचे दो नवीन व्हेरियंट आढळले आहेत. हे दोन्ही व्हेरियंट ओमिक्राॅनचे सब-व्हेरियंटच आहेत. BA.5.1.7 आणि BF.7 अशी या सवव्हेरियंटना नाव देण्यात आली आहेत. या नवीन व्हेरियंटची संक्रमण क्षमता अधिक अल्याचे मानल जात आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात कोरोनाची रूग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे.

असा आहे ओमिक्राॅन BF.7

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

BF.7 सब व्हेरियंट ओमिक्रोन स्पाॅन नावाने ही ओळखला जात आहे. हा नाॅर्थवेस्ट चीनमधील मंगोलिया या स्वायत्त प्रदेशात सर्वप्रथम आढळला होता. चीनमधील कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येसाठी हाच व्हेरियंट जबाबदार ठरत आहे. हा सबव्हेरियंट खुप वेगाने पसरत असून युएसए, युके, ऑस्ट्रेलिया आणि बेल्जियम मध्ये ही याचे रूग्ण आढळले आहेत. भारतातही ओमिक्राॅन BF.7 चा रूग्ण आढळला आहे. गुजरात बायोटेक्नाॅलाॅजी रिसर्च सेंटरमध्ये हा रूग्ण आढळला. अशा परिस्थितीत सण-उत्सवाच्या काळात नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

ओमिक्राॅन BF.7 ची लक्षणे

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सतत खोकला येणे, ऐकु न येणे, छातीत दुखणे, शरीर थरथर कापणे, वास घेण्याची क्षमता नाहीशी होणे ही ओमिक्राॅन BF.7 ची सामान्य लक्षणे आहेत. तज्ज्ञांच्या मते, ओमिक्राॅन आणि त्याच्या सबव्हेरियंटची लक्षणे अतिशय सौम्य आहेत. नागरिकांनी एकदम घाबरण्याची गरज नाही. पण, हार्ट डिसीज, किडनीचे आजार आणि यकृताच्या आजाराने त्रस्त असलेल्यांमध्ये ही लक्षणे गंभीर स्वरूपात दिसू शकतात. ओमिक्राॅन BF.7 हा व्हेरियंट लवकरच आधीपासून अस्तित्वात असलेल्या व्हेरियंटची जागा घेईल अशी भिती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

इतर व्हेरियंटच्या तुलनेत BA.5.1.7 आणि BF.7 ची संक्रमण क्षमता अधिक

ओमिक्राॅनच्या दोन्ही सबव्हेरियंटचा संसर्ग दर खुप जास्त आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे नवीन प्रकार एखाद्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती सहजपणे कमी करू शकतात. पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांना देखील याचा संसर्ग होउ शकतो. या व्हेरियंट्स चे केवळ काही विषाणूजन्य कण एखाद्या व्यक्तीला संक्रमित करण्यासाठी पुरेसे आहेत. म्हणजेच इतर सर्व व्हेरियंटच्या तुलनेत, या सबव्हेरियंटच्या संपर्कात आल्याने व्यक्तीला लवकर संसर्ग होउ शकतो.

सबव्हेरियंट ठरणार चिंतेचे कारण?

ओमिक्राॅनचे हे सबव्हेरियंट या पुर्वीचा संसर्ग किंवा व्हॅक्सिनेशनमुळे तयार झालेल्या अॅंटिबाॅडीजवर सहज मात करू शकतात. नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑफ इम्युनायझेशनचे अध्यक्ष डा. एन.क. अरोरा म्हणाले, येणारे दोन ते तीन आठवडे महत्वाचे असतील. कोविड-19 अजूनही आपल्या आजूबाजूला आहे. जगाच्या विविध भागांमध्ये त्याची नवीन रूप उदयास येत आहेत. आपण यापासून जास्त काळ दूर राहू शकत नाही. त्यामुळे सणासुदीच्या काळात तुम्ही सतर्क राहणे आणि आवश्यक ती सर्व खबरदारी पाळणे गरजेचे आहे.

नवीन व्हेरियंट आणि सबव्हेरियंटमुळे कोविड-19 ची रूग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. प्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या व्यक्तींमध्ये याची गंभीर लक्षणे दिसून येतात. तज्ज्ञांचे म्हणऐ आहे कि, सणासुदीच्या काळात बहुतेक लोक खरेदीसाठी बाहेर पडतात. तिथे सोशल डिस्टन्सिंगचे नियम अजिबात पाळले जात नाहीत. लोक मास्क न वापरता बाहेर पडत आहेत. त्यामुळे या काळात कोविडची प्रकरणे झपाट्याने वाढतात. हे टाळण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळले पाहिजेत. मार्केटमध्ये अवास्तव गर्दी करू नये.

हे पण वाचा :-

अरूणाचल मध्ये कोसळले लष्कारचे हेलिकाॅप्टर

अनाधिकृत बांधकामांवर चालला बुलडोजर वसई-विरार महानगर पालिकेची धडक कारवाई

Comments are closed.