Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

उप पोलीस स्टेशन पेरमिली येथे विरपत्नींच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पेरमिली, दि. २६ जानेवारी: आज दि. २६/०१/२०२१ रोजी अहेरी तालुक्यातील उप पोस्टे पेरमिली येथे प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी पोस्टे हद्दीतील मौजा कोरेली गावचे सुपुत्र, शहिद गिरिधर नागो आत्राम यांच्या विरपत्नी चब्बु गिरिधर आत्राम यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्रभारी अधिकारी पंकज सपकाळे यांनी मनोगत व्यक्त केले की गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षल विरोधी अभियानात कर्तव्य बजावताना पोलीस दलातील जवानांनी प्राणांची आहूती दिली आहे. दि. ११/०४/२०१४ रोजी लोकसभा मतदानाची पोलींग पार्टी परत घेऊन येत असताना नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यात पोलीस अंमलदार गिरिधर नागो आत्राम यास वीरमरण प्राप्त झाले होते त्यांच्या बलिदानाची, त्यागाची आठवण म्हणून त्यांच्या विरपत्नींच्या हस्ते ध्वजारोहण केले याप्रसंगी त्याचा मुलगा अमन गिरिधर आत्राम हा उपस्थित होता यांचा उप पोस्टे पेरमिली कडून सत्कार करण्यात आला. यावेळी प्रभारी अधिकारी पंकज सपकाळे, CRPF चे असिस्टंट कमांडर हरिश्चंद्र शर्मा,  अखिलेश पाठक, पोउपनि धवल देशमुख, SRPF चे पोउपनि भोसले व सर्व अमंलदार, जवान उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोउपनि धनंजय पाटील यांनी केले. सर्वांना अल्पोपहार व चहापाणी देवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.